Corona e sakal
देश

फायझरचे घेतले तीन डोस; तरीही मुंबईतील व्यक्ती ओमिक्रॉन बाधित

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कहून परतलेल्या एका 29 वर्षीय पुरुषाला ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. काल शुक्रवारी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. (Omicron Positive) या व्यक्तीमध्ये कसल्याही प्रकारची लक्षणे दिसून आलेली नव्हती. तसेच त्या व्यक्तीने फायझरच्या लशीचे (Pfizer Vaccine) तीन डोस घेतले होते. या व्यक्तीची 9 नोव्हेंबर रोजी विमानतळावर चाचणी करण्यात आली होती, ज्यामध्ये तो पॉझिटीव्ह निघाला होता. त्यानंतर त्याचे नमूने जिनोम सिक्वन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. (Omicron in India)

15 मधील 13 रुग्ण बरे

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दोघांचीही चाचणी निगेटीव्ह आली आहे. मात्र, रुग्णाला दक्षता म्हणून दवाखान्यात भरती करण्यात आलं आहे तसेच त्याच्यामध्ये कसलीही लक्षणे नाहीयेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सध्या ओमिक्रॉनची संख्या 15 झाली असून त्यातील पाच जण हे मुंबईच्या बाहेरचे आहेत. यामधील 13 जण बरे झाले असून दवाखान्यातून घरी गेले आहेत. शहरामध्ये आतापर्यंत आढळलेल्या 15 ओमिक्रॉन बाधित रुग्णांमध्ये कसल्याही प्रकारचे गंभीर लक्षण दिसून आलेले नाहीयेत.

कलम 144 लागू

ओमिक्रॉनच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 16 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू केले आहे. याअतंर्गत मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र जमण्यावर प्रतिबंध लादण्यात आला आहे. जेणेकरुन गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार टाळता येऊ शकेल. कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी 50 टक्के क्षमतेच्या वर परवानगी नसेल. तसेच सर्वांचे लसीकरण झालेले असणे अनिवार्य असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

SCROLL FOR NEXT