PM Narendra Modi Life Threat
PM Narendra Modi Life Threat sakal
देश

पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी, NIA मुंबई शाखेला धमकीचे ई-मेल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हत्येचा कट उघड झाला असून, या संदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला आहे. या ई-मेलमध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीकडे 20 किलो आरडीएक्स असल्याचा दावाही करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारे ई-मेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच एनआयएने या मेलची माहिती इतर सुरक्षा यंत्रणांनाही दिली असून, एनआयएने या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपासही सुरू केला आहे. याआधीही अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याची योजना असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा डाव उधळला गेला आहे. याबाबत पत्रिकाडॉटकॉमने वृत्त प्रकाशित केले आहे. (Mumbai NIA Branch Received Threats Mail)

मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएच्या मुंबई शाखेला पीएम मोदींच्या हत्येचा कट रचण्याचे धमकीचे पत्र मिळाले होते. या ईमेलमध्ये धमकी देणाऱ्यांनी 20 किलो आरडीएक्सद्वारे पीएम मोदींना मारण्याबद्दल भष्य केले होते. याशिवाय या मेलमध्ये दोन कोटी लोकांनादेखील जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. मात्र, या मेलमध्ये किती तथ्य आहे आणि ते कुठून पाठवले आहे, याचा तपास सुरू आहे.

20 स्लीपर सेल तयार करण्याचा दावा

प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यासाठी 20 स्लीपर सेल (Sleeper Cell) सज्ज असल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर ई-मेलमध्ये 20 किलो आरडीएक्ससह (RDX) हल्ल्याची योजना आखण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा दावा एएनआयकडून केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT