देश

तेरा वर्षांच्या मुलाला चार महिने ठेवलं डांबून; साधूला 7 वर्षांची शिक्षा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: 2015 मध्ये एका 57 वर्षीय व्यक्तीने 'साधू'च्या वेशात एका 13 वर्षीय मुलाला आमिष दाखवून शहरातून पळवून बनारसला नेलं आणि चार महिन्यांहून अधिक काळ एका खोलीत बंद केल्याची घटना घडली आहे. या आरोपीला गेल्या सोमवारी दिंडोशी येथील सत्र न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

पीडित मुलाने आपली साक्ष नोंदवताना न्यायालयात म्हटलंय की, त्या आरोपीनं त्याला कधीही खोलीबाहेर एकटं सोडलं नाही. तसेच जेव्हा जेव्हा ते बाहेर गेले तेव्हा तो त्याचा हात धरायचा, त्यामुळे तो या प्रकाराबाबत कोणालाही कळवू शकला नाही. मात्र, बनारसमध्ये ट्रेनमधील एका सहप्रवाशाला या साऱ्या प्रकाराचा संशय आला आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलंय. साधू असल्याचा दिखावा करणारा आरोपी लक्ष्मण शर्मा त्या मुलाला आपल्यासोबत ट्रेनमधून कुठेतरी नेण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळीच त्याला पोलिसांकडून वाचवण्यात आलं. त्याचवेळी शर्मा यांना अटक करण्यात आली होती.

त्या मुलाने न्यायालयात सांगितलं की, 27 नोव्हेंबर 2015 रोजी बागेतून घरी परतत असताना भगवे वस्त्र परिधान केलेला हा माणूस त्याच्याजवळ आला. त्याने त्याला बिस्किट देऊ केलं होतं आणि नंतर त्याच्यासोबत नॅशनल पार्कमध्ये येण्यास सांगितलं होतं. त्याने यासाठी नकार दिला पण त्या माणसाने पैसे देऊ केल्यानंतर तो सोबत गेला होता. नॅशनल पार्कमध्ये त्या माणसाने त्याला सांगितलं की तो त्याला घरी सोडेल, परंतु त्याऐवजी त्याने त्याला बनारसला नेलं. त्यावेळी तो बेशुद्धीत होता. जेंव्हा तो शुद्धीत आला तेंव्हा एका खोलीत तो जागा झाला होता. त्या व्यक्तीने त्याला जवळपास 4 महिने ताब्यात ठेवलं होतं.

आरोपीच्या वकिलाने त्याची शिक्षा कमी करण्याची मागणी केली होती कारण त्याने आधीच काही काळ तुरुंगात घालवला होता. मात्र, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.यू. बघेले यांनी आपल्या आदेशात म्हटलंय की, आरोपी शर्मा हा जास्तीत जास्त शिक्षेला पात्र आहे कारण त्याने मुलाचे अपहरण करून चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी ताब्यात ठेवलंय आणि हा गुन्हा गंभीर असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तसेच आरोपीला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT