Mundra Port
Mundra Port esakal
देश

Mundra Drug case : 3,000 किलो ड्रग्ज जप्ती प्रकरणी NIAकडून आणखी तिघांना अटक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : गुजरातमधील मुंद्रा बंदरात आढळलेल्या तब्बल ३,००० किलो हेरॉईन्स (ड्रग्ज) प्रकरणी राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) आणखी तीन जणांना अटक केली आहे. यापूर्वी दोन जणांना दिल्लीतून अटक करण्यात आली होती, त्यामुळं या प्रकरणात आता पाच जणांना अटक झाली आहे. (Mundra Drugs case Three more arrested by NIA in drug case worth 3000 crores)

राह मातुल्लाह, इश्विंदर सिंग आणि जसबीर सिंग अशी अटक झालेल्या या तिघांची नावं आहेत. या तिघांना १४ सप्टेंबर रोजी अशाच प्रकारे समुद्रामार्गे विविध कंटेनरमधून ड्रग्जच्या खेप आणल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यांची कसून चौकशी झाल्यानंतर मुंद्रा ड्रग्ज प्रकरणातही त्यांचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे.

दरम्यान, यापूर्वी २६ ऑगस्ट २०२२ रोजी एनआयएनं दिल्लीतील २० विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये दोन जणांना अटक झाली होती. हरप्रीत सिंग तलवार ऊर्फ कबीर तलवार, प्रिन्स शर्मा शी या दोघांची नावं आहेत. हे दोघेही ड्रग्ज तस्करीतील आंतरराष्ट्रीय टोळीतील लोक आहेत. त्यांनी अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज भारतात आणले होते, अशी माहिती एनआयएनं त्यावेळी दिली होती.

मुंद्रा बंदर ड्रग्ज प्रकरण काय?

गेल्यावर्षी १३ सप्टेंबर रोजी महसूल संचालनालयाकडून गुजरातमधील मुंद्रा बंदरावर २९८८ किलो हेरॉईन्स जप्त केलं होतं. अफगाणिस्तानातील कंदाहर बंदरातून इराणच्या अब्बास बंदरातून ड्रग्जची ही खेप समुद्रामार्गे भारतात आणण्यात आली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी ड्रग्ज आढळून आल्यानं देशभरात खळबळ उडाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT