murder case murder case
देश

दिल्लीतील खुनाचा छडा; दिव्यांगच निघाला आरोपी; दोघांना अटक

आपल्यावर संशय येऊ नये म्हणून दिव्यांग रात्रभर मृतदेहाजवळ झोपला होता

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : नववर्षाच्या पूर्वसंध्येला एका व्यक्तीची हत्या (Murder in Delhi) झाली होती. मृतदेहाजवळ दिव्यांग व्यक्ती झोपला होता. पोलिसांनी या खुनाचा छळा लावला आहे. दिव्यांग व्यक्तीच खुनी असल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे. आपल्यावर संशय येऊ नये म्हणून तो रात्रभर मृतदेहाजवळ झोपला होता, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक (Both arrested) केली आहे.

सुभाषनगर परिसरातील सूर्या हॉटेलच्या आवारात एका इसमाचा मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना १ जानेवारी रोजी मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना एक मृतदेह दिसून आला. मृतदेहाच्या शरीरावर चाकूने वार करण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केल्यानंतर मृताचे नाव चंदन (रा. सुभाषनगर) असल्याचे निष्पन्न झाले.

चंदन हा राजौरी गार्डनमधील अन्सल प्लाझा मॉलमध्ये दोन मित्रांसोबत नवीन वर्ष साजरा करण्यासाठी गेला होता. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास चंदन हा सिगरेट घेण्यासाठी सूर्या हॉटेलबाहेरील दुकानात गेला होता, असे दोन मित्रांनी पोलिसांना सांगितले. ६५ वर्षीय दिव्यांग संतोष या भिकाऱ्याशी चंदनची भेट झाल्याचे पोलिसांना तपासादरम्यान समजले. दोघेही दारू पिऊन असल्याने कोणत्या गोष्टीवरून त्यांच्यात वाद झाला असावा असा पोलिसांना संशय आहे.

दोघांचा वाद सुरू असताना २० वर्षीय विनोद तिथे आला. विनोद हा दिव्यांग संतोषची काळजी घेत होता. चंदनने दारूच्या नशेत दिव्यांग संतोषशी वाद घातला. यानंतर त्याला मारहाण केली. यामुळे चिडलेल्या संतोष आणि विनोदने चंदनला मारहाण केली. यानंतर विनोद आणि संतोष यांनी चंदनवर चाकूने हल्ला केला. यात चंदनचा मृत्यू (Murder in Delhi) झाला.

दोन्ही आरोपी अटकेत

चंदनचा मृत्यू झाल्याचे समजताच विनोद घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये म्हणून संतोष मृतदेहाच्या बाजूलाच झोपून होता. दिव्यांग असल्याने पोलिस आपल्यावर संशय घेणार नाही, असा त्याचा समज होता. मात्र, पोलिसांनी खुनाचा छळा लावला आणि दिव्यांग संतोषला अटक केली. यानंतर विनोदलाही पोलिसांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शांतता कराराची घोषणा पण ट्रम्पसमोर इराणच्या ३ मोठ्या अटी, अमेरिका-इराण डीलमध्ये १४ मुद्दे महत्त्वाचे

Fifa World Cup 2026: ब्राझीलला बरोबरीचेच समाधान; मोरोक्कोसमोर पाच वेळच्या विजेत्यांचा कस, व्हिनिसियसच्या गोलने दिलासा

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेचा प्रवेशोत्सव सोहळा

Kasba Beed Gold Coins : शिलाहार राजवंशाची उपराजधानी असलेल्या कोल्हापूरच्या 'या' गावात पुन्हा सापडल्या सुवर्णमुद्रा! काय आहे अतिप्राचीन 'बेडा' आणि त्रिशूळाचे रहस्य?

SCROLL FOR NEXT