Murder of a minor girl in Madhya pradesh Murder of a minor girl in Madhya pradesh
देश

अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून खून; दगडाने ठेचल्याने २० हाडे तुटली

सकाळ डिजिटल टीम

ग्वाल्हेर : नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर दगडाने ठेचून हत्या (Murder) करण्यात आली. दगडाने ठेचल्याने मुलीच्या चेहऱ्याची व डोक्याची २० हाडे तुटली. यामुळे मुलीचा जागीच मृत्यू झाला, असे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. ही घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडली होती. (Murder of a minor girl in Madhya pradesh)

हजीरा येथील शिवनगर कॉलनीत राहणारी नऊ वर्षांची मुलगी २६ जून रोजी दुपारी घराबाहेर खेळत होती. मात्र, दुपारनंतर ती बेपत्ता झाली. मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, तिचा पत्ता लागला नाही. रात्री उशिरा कुटुंबीयांनी हजीरा पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि घराजवळील सीसीटीव्ही तपासले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी अल्पवयीन मुलीला घेऊन जाताना दिसला. आरोपीने मुलीला चॉकलेट देण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे नातेवाईक कल्लू राठोडच्या घरावर छापा टाकला. मात्र, त्याचा सुगावा लागला नाही. २८ जून रोजी सकाळी हजीरा परिसरातील ट्रॅकजवळ मुलीचा मृतदेह (Murder) नग्नावस्थेत आढळला होता.

आरोपी कल्लू राठोडवर बलात्कारासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पकडून देणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. आरोपीला पकडण्यासाठी देऊळभर रेल्वे स्टेशनसह अन्य ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. ग्वाल्हेर पोलिसांची १० पथके मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आरोपीच्या शोधात पाठवले आहेत, असे एसएसपी अमित सांघी यांनी सांगितले.

चेहऱ्यावर आणि डोक्यावर दगडाने अनेक वार

शवविच्छेदन अहवालानुसार, नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अगोदर बलात्कार (Atrocity) करण्यात आला. त्यानंतर तिची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली. आरोपीने मुलीच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर दगडाने अनेक वार केले. यामुळे मुलीच्या चेहऱ्याची १४ हाडे तुटली, तर डोक्याची ६ हाडे तुटली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT