Uttar Pradesh Crime News Uttar Pradesh Crime News
देश

पाच वर्षीय भाचीची मामाने केली हत्या; आंबा मागितल्याने आला राग

सकाळ डिजिटल टीम

शामली : जेवत असताना भाची वारंवार आंबा मागत होती. यामुळे चिडलेल्या मामाने पाच वर्षीय भाचीची हत्या (Murder) केली. पोलिसांनी आरोपी मामा उमरदीन (३३) याला अटक केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) शामली जिल्ह्यातील खेडा कुर्तन गावात घडली. खैरू निशा असे मृत भाचीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षीय भाची खैरू निशा ही जेवण करताना वारंवार आंबा मागत होती. त्यामुळे नाराज झालेल्या मामाने तिची हत्या केली. मामाने प्रथम भाचीच्या डोक्यावर रॉडने वार केले. भाचीला रक्तस्त्राव होऊ लागला तेव्हा मामाने गळा चिरून हत्या (Murder) केली. यानंतर तिचा मृतदेह गोणीत भरला, असे पोलिसांनी सांगितले.

खैरु निशा ही मजुराची मुलगी आहे. दुपारी बेपत्ता झाली होती. रात्री पोलिसांना तिचा मृतदेह आरोपी उमरदीनच्या घरात सापडला. कांधलाचे एसएचओ श्यामवीर सिंह यांनी सांगितले की, आरोपी गावकऱ्यांसोबत मुलीच्या शोधात गेला होता. मात्र, पोलिसांना संशय आल्यानंतर तो लगेच गायब झाला.

शामलीचे एएसपी ओपी सिंग यांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपी उमरदीनला गावाजवळील जंगलातून अटक केली आणि त्याच्या ताब्यातून हत्येसाठी वापरलेली शस्त्रे (चाकू आणि लोखंडी रॉड) जप्त केली. आरोपीला (Accused Arrested) गुरुवारी रात्री अटक करून शुक्रवारी कारागृहात पाठवण्यात आले. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT