high court.j 
देश

निकाहसाठी मुस्लिम मुलगी सज्ञानच हवी असं नाही - हायकोर्ट

सकाळन्यूजनेटवर्क

चंदीगढ- पंजाब-हरियाणा हायकोर्टाने मुस्लिम निकाहबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुस्लिम मुलगी सज्ञान नसली तरी तिचा निकाह वैध आहे. एका मुस्लिम प्रेमी जोडप्याच्या सुरक्षेप्रकरणी याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. प्रेमीयुगुल मोहालीचे आहेत. 

मुस्लिम पर्सनल लॉचा हवाला देताना हायकोर्टाने सांगितले की, जर मुस्लिम मुलगी सज्ञान नसली तरी तिचा निकाह वैध असेल. मोहालीचे रविवाशी असणाऱ्या प्रेमी जोडप्याने याचिका दाखल केली होती की, त्यांनी मुस्लिम रितीरिवाजानुसार त्यांच्या घरच्यांविरोधात जाऊन निकाह केला आहे. त्यांच्या या निकाहाने त्यांच्या घरचे नाराज आहेत आणि त्यांच्या जीवाला धोका आहे. युवकाचे वय ३६ वर्षे आहे आणि मुलीचे वय १७ वर्षे आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितलं की मुलगी अल्पवयीन असून तिला त्यांच्याकडे सोपवले जावे.  

धक्कादायक! टाय घातला नाही म्हणून खासदाराला संसदेतून काढलं बाहेर

याचिकाकर्त्याने सांगितलं की, जानेवारीमध्ये त्यांने लग्न केलं होतं. तेव्हापासून आमच्या जीवाला धोका आहे. लग्नानंतर दोघांनीही सुरक्षा मिळावी यासाठी मोहालीच्या एसएसपींकडे विनंती केली होती. मात्र त्यांच्याकडून सुरक्षेसाठी काहीच पावले उचलली नाहीत.  एसएसपींनी काहीच हालचाल न केल्यानं याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायलयात धाव घेतली. 

याचिकेवर उच्च न्यायालयाने म्हटलं की, मुस्लिम प्रेम युगुलाच्या प्रकरणात विवाहासाठी मुलगी सज्ञान असणं गरजेचं नाही. जर ती तरुण असेल तर तिला जोडीदार निवडण्याचा अधिकार मिळतो. मुलगी ठरवू शकते की तिला कोणाशी लग्न करायचं आहे आणि कोणासोबत आयुष्य काढायचं आहे. संविधान तिला स्वतंत्र जगण्याचा आणि मनाप्रमाणे जोडीदार निवड़ण्याचा अधिकार देते. उच्च न्यायालयाने मोहालीच्या एसएसपींना आदेश दिला आहे की, त्यांनी प्रेमी जोडप्याला देण्यात येणाऱ्या सुरक्षेचा आढावा घ्यावा. त्यांच्या जीवाला कोणता धोका निर्माण होणार नाही हे पहावं असंही सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

Deepti Sharma: गेल्या वर्षी वर्ल्ड कप जिंकवला, अन् आता पाकिस्तानलाही नडली! भारताच्या 'या' लेकीने ऐतिहासिक विजयानंतर नेमकं काय म्हटलं?

Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरला येणार!, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंदाच्या पाहणीसाठी दाखल

Latest Marathi News Live Update : पद्मसिंह पाटील कोर्टात दाखल

Whatsapp मध्ये मोठं अपडेट! आता विना मोबाईल करता येणार व्हिडिओ अन् ग्रुप वॉइस कॉल; पण कसं? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT