nagaland 
देश

राज्यातील स्थिती धोकादायक, नागालँडमध्ये पुन्हा AFSPA लागू; केंद्राची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्रालयाने नागालँडला अशांत क्षेत्र घोषित केलं आहे. याबाबत मंत्रालयाने बुधवारी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, मंत्रालयाने सशस्त्र बल विशेषाधिकार कायद्यांतर्गत राज्यात पुढच्या सहा महिन्यासाठी अशांत क्षेत्राची घोषणा केली आहे. 

राज्यातील सीमेच्या आत असलेला भाग सध्या अशांत आणि धोकादायक स्थितीत आहे. यामुळे नागरिक प्रशासन यांच्या मदतीसाठी सशस्त्र बलाचा वापर करणं गरजेचं असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. 

केंद्र सरकारने असं म्हटलं की, नागालँड राज्यात अशांत, गोंधळाची आणि धोकादायक अशी परिस्थिती आहे. यामुळे इथल्या नागरिक प्रशासनाच्या मदतीसाठी सशस्त्र दलाचा वापर करणं आवश्यक आहे. आता सशस्त्र बल अधिनियम 1958 च्या कलम 3 अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करत केंद्र सरकारकडून संपूर्ण नागालँडमध्ये 30 डिसेंबरपासून 6 महिन्यांसाठी अशांत क्षेत्राची घोषणा करण्यात आली आहे. 

याआधी 1 जुलैलासुद्धा नागालँडला अशांत क्षेत्र घोषित करण्यात आलं होतं. त्यावेळच्या अधिसूचनेनुसार 6 महिन्याचा कालावधी होता. तेव्हा राज्यातील स्थिती त्रासदायक आणि धोक्याची असल्याचं म्हटलं होतं. अशांत क्षेत्र घोषित केल्यानंतर राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सशस्त्र बलाकडे जबाबदारी सोपवली जाते. AFSPA अंतर्गत अशांत क्षेत्रात त्यांच्या विशेष अधिकारांचा वापर करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs WI: 'मला त्याबद्दल वाईट वाटतंय...' पाकिस्तानविरुद्धच्या अवघ्या ५ धावांच्या पराभवानंतर श्रीलंकेचा जयसूर्या सोडणार पद

कांदा उत्पादकांची व्यथा! एकरी खर्च १ लाख, उत्पन्न ६३ हजार; नफा राहुदे, स्वत:चेच ४० हजार खर्च

Mumbai Pune Expressway: पुन्हा टँकर उलटला तर एअरलिफ्ट करणार, चाचणी सुरू; मंत्र्यांनी दिले अपडेट

Latest Marathi News Update : युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्याविरोधात फतवा; जामकरन मशिदीवर लाल ध्वज फडकला

Marriage Astrology : 'या' महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीनी अजिबात करू नये 'सिंह' राशीवाल्यांशी लग्न; नाहीतर लग्न अजिबात टिकणार नाही

SCROLL FOR NEXT