Nagaland Assembly Election Results  esakal
देश

Assembly Election : 'या' राज्यात घडला इतिहास; तब्बल 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडून आली महिला उमेदवार

गेल्या 14 विधानसभा निवडणुकीत या राज्यात एकदाही महिला आमदार निवडून आलेली नाही.

सकाळ डिजिटल टीम

भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (Nationalist Democratic Progressive Party) हेकानी जाखलू (Hekani Jakhalu) या राज्यातील पहिल्या महिला आमदार बनल्या आहेत.

Nagaland Assembly Election Results : गेल्या 14 विधानसभा निवडणुकीत या राज्यात एकदाही महिला आमदार निवडून आलेली नाही. नागालँडनं पहिल्यांदाच एका महिलेला विधानसभेवर निवडून दिलंय.

ईशान्येकडील नागालँड विधानसभेत (Nagaland Assembly) गेल्या 60 वर्षांत एकही महिला आमदार निवडून येऊ शकली नव्हती. मात्र, आज इतिहास घडला असून स्वातंत्र्यानंतर तब्बल 60 वर्षांनंतर नागालँडच्या विधानसभेत महिला पोचलीये.

भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (Nationalist Democratic Progressive Party) हेकानी जाखलू (Hekani Jakhalu) या राज्यातील पहिल्या महिला आमदार बनल्या आहेत. हेकानी जाखलू यांनी दिमापूर III च्या जागेवर लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते अझेतो झिमोमी यांचा 1,536 मतांनी पराभव करून विजय मिळवला.

हेकानी जाखलू यांना सभागृहात आणखी एका महिला आमदाराची साथ मिळू शकते. नागालँडसाठी हा दुहेरी आनंद असू शकतो. NDPP चे सलहौतुओनुओ क्रुसे हे पश्चिम अंगामी मतदारसंघात 400 पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत 14 विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. याआधी नागालँडमध्ये एकही महिला आमदार म्हणून निवडून आली नाही.

नागालँड विधानसभेसाठी यंदाच्या निवडणुकीत 183 उमेदवारांमध्ये चार महिलांचा समावेश होता. मुख्यमंत्री नेफियु रिओ यांच्या नेतृत्वाखालील एनडीपीपी 2018 च्या गेल्या निवडणुकीपासून भाजपसोबत युती करत आहे. मागील निवडणुकीत 30 जागा जिंकणारी युती सध्या 39 वर आघाडीवर आहे. 60 जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा 31 आहे. जागावाटपाच्या करारानुसार भाजपनं 20 जागा लढवल्या, तर एनडीपीपीनं 40 जागा लढवल्या.

कोण आहेत हेकानी जाखलू?

हेकानी जाखलू या व्यवसायानं वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. दिमापूरमधील हेकानी जाखलू यांनी दिल्ली आणि लंडन इथं शिक्षण घेतलं. त्यांनी तब्बल 18 वर्षे एनजीओमध्ये काम केलं आहे. अमेरिकेत काही काळ काम केल्यानंतर त्या भारतात परतल्या होत्या. त्यांनी सात महिन्यांपूर्वी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांचे पती अलिजा जाखलू दिमापूरमधील मोठे कंत्राटदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT