Nagaland minister Temjen Imna Along stuck in pond 
देश

Viral Video: नागालँडचे मंत्री अडकले दलदलीत; बाहेर निघताना आले नाकीनऊ; पाहा व्हायरल व्हिडिओ

Nagaland minister Temjen Imna Along stuck in pond: नागालँडचे पर्यटन मंत्री तेमजेन इम्रा अलॉन्ग आपल्या वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. ते अनेकवेळा स्वत:चीच खिल्ली उडवताना दिसतात. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- नागालँडचे पर्यटन मंत्री तेमजेन इम्रा अलॉन्ग आपल्या वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. ते अनेकवेळा स्वत:चीच खिल्ली उडवताना दिसतात. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे त्यांनीच हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते एका तळ्यात अडकल्याचं दिसत आहेत. यातून बाहेर निघण्यासाठी ते प्रयत्न कराताहेत पण त्यांना ते सहज शक्य होत नाही.

तळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांचे सहकारी त्यांना मदत करतात. पण, वजन जास्त असल्याने त्यांना देखील खूप मेहनत घ्यावी लागते. यावेळी त्यांचे सहकारी या प्रकाराचा आनंद घेताना दिसत आहेत. खूप प्रयत्न करुन काहीवेळाने ते स्वत:च तळ्याच्या बाहेर निघतात. तेमजेन इम्रा अलॉन्ग हे स्वत:चीच फिरकी घेत असल्याचं यातून दिसून येत आहे. ( Nagaland minister Temjen Imna Along stuck in pond Watch the viral video)

तळ्यात अडकडले तेमजेन इम्रा अलॉन्ग म्हणतात की, मी एक मोठा मासा आहे. मला माहिती नव्हतं की तळे इतके मोठे होते. पोटाच्या साहाय्याने ते हळू-हळू बाहेर निघतात. त्यांच्या संपूर्ण अंगाला चिखल लागलेला दिसत आहे. तळ्याच्या बाहेर येऊन ते खुर्ची मागवतात आणि त्यात आरामात बसतात. हे सर्व खेळीमेळीच्या वातावरणात होत असल्याचं दिसतं.

इम्रा हे नागालँड राज्य सरकारमध्ये पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री आहेत. त्यांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की, आज जेसीबीची परीक्षा होती. गाडी खरेदी करण्याआधी एनसीपीए रेटिंग जरून पाहा कारण यात तुमच्या जिवाचा प्रश्न आहे. या व्हिडिओला लोकांकडून मोठ्या प्रमाणात पसंदी मिळत आहे. लोक यावर प्रतिक्रिया देखील देत आहेत. दरम्यान, इम्रा अनेकदा काहीना काही पोस्ट करत असतात. लोकांना त्यांचा हा थट्टा करणारा स्वभाव आवडतो. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT