Nagpur news Only two thousand tons of poppy left in the country 
देश

देशात फक्त दोन हजार टन खसखस शिल्लक; १,४०० रुपये किलोच्या भावाने विक्री

राजेश रामपूरकर

नागपूर : खाद्यपदार्थांचा आस्वाद वाढविणाऱ्या खसखशीचे उत्पादन घटले आहे. देशात आता फक्त दोन हजार टन खसखस शिल्लक आहे. यामुळे खसखस महाग होत असल्याचे चित्र आहे.

भारतात मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेशात खसखशीची लागवड केली जाते. खसखशीची लागवड करण्यासाठी केंद्र सरकारच्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोची परवानगी घ्यावी लागते. नवीन खसखशीची आवक पुढील वर्षी मार्च महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात दोन ते अडीच हजार टन खसखशीचे उत्पादन होण्याचे संकेत आहेत.

तुर्कीत जुलै, ऑगस्ट महिन्यात पांढऱ्या खसखशीचे १८ हजार टन उत्पादन झाले आहे. चेक रिपब्लिकमध्ये पाचशे टन, चीनमध्ये तीन हजार टन उत्पादन आले आहे. भारतात साधारणपणे दरवर्षी वीस हजार टन खसखशीची विक्री होते. देशात गेल्या वर्षी आयात केलेल्या खसखशीचा साठा कमी असून, देशात दोन हजार टन खसखस उपलब्ध आहे.

केंद्र सरकार खसखस आयातीची परवानगी मार्च आणि एप्रिल महिन्यात देण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात खसखशीचा तुटवडा आहे. त्यामुळे खसखशीचे दर तेजीत आहे. दरात आणखी वाढ होण्याची शक्यता पटेल यांनी व्यक्त केली आहे.

सध्या बाजारात एक किलो खसखशीची विक्री १,२५० ते १,४०० रुपये दराने केली जात आहे. खसखशीचा वापर मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यावसायिक, मिठाई विक्रेत्यांकडून केला जातो.

दर तेजीत

भारतात पांढऱ्या खसखशीला मोठी मागणी असते. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशात निळी खसखस वापरली जाते. बर्गर तसेच पावासाठी या खसखशीचा वापर केला जातो. पिवळ्या खसखशीचा वापर तुर्कीत क्रिम तयार करण्यासाठी केला जातो. देशाअंतर्गत खसखशीची आवक सुरू झाल्यानंतर केंद्र सरकार खसखस आयातीला परवानगी देईल, तोपर्यंत दर तेजीत राहणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: 'भारतीय बौद्ध महासभेचे साेलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन'; दीक्षाभूमीचे व्यवस्थापन द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे देण्याची मागणी

Pune Navratra Mahotsav : ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’मध्ये कला, संस्कृती, गायनाचा संगम; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्‍घाटन

IND vs PAK : Andy Pycroft हे भारताचे आवडते, रमीझ राजा यांचा जावई शोध! पण, Fact Check ने पाकिस्तानला पुन्हा तोंडावर पाडले

SIP Tips: SIP मध्ये रोज 100 रुपये की महिन्याला 3000 रुपये गुंतवणूक करावी? कुठे होतो जास्त फायदा?

Share Market Opening: शेअर बाजारात अच्छे दिन! असं काय घडलं की अचानक सेन्सेक्स वाढला, निफ्टी २५,४०० वर

SCROLL FOR NEXT