Nandi Parvat Ashram Jain Muni Kamkumar Maharaj esakal
देश

Jain Muni Case : शरीराचे तुकडे करुन जैन मुनींची निर्घृण हत्या; 'ती' डायरी पोलिसांच्या लागली हाती

जैनमुनी कामकुमार महाराज (Kamkumar Nandi Maharaj) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ डिजिटल टीम

दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी १० ते १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत त्यांची चौकशी झाली आहे.

चिक्कोडी : हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमाचे जैनमुनी कामकुमार महाराज (Kamkumar Nandi Maharaj) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. स्वामींची डायरी पोलिसांच्या हाती लागली असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.

त्यामुळे या प्रकरणात आणखी काहीजणांची चौकशी होण्याची शक्यताही वर्तवली आहे. माहिती अशी, जैन मुनींची हत्या केलेल्या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी १० ते १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत त्यांची चौकशी झाली आहे. पहिल्यांदा त्यांनी स्वामींची डायरी जाळून टाकल्याचे म्हटले होते.

त्याची राख पोलिसांनी बंगळूरला तपासासाठी पाठविली होती. ती राख डायरीची नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यावर पोलिसांनी पुन्हा चौकशी करून डायरी शोधून काढून ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. या डायरीत स्वामींच्या आर्थिक विषयांवर प्रकाश पडणार असल्याने त्यात नावे असलेल्यांची चौकशी पोलिस करण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा संशयित मारेकऱ्यांनी ही डायरी जाळल्याचे म्हटले होते.

त्यांनी त्याप्रमाणे पोलिसांना का सांगितले होते? याबाबतही पोलिस चौकशी करणार आहेत. पोलिसांनी घटनास्थळासह अनेक ठिकाणी मारेकऱ्यांना फिरवून पुरावे गोळा करण्याचे काम केले आहे. आता संशयित मारेकऱ्यांना न्यायालयीन कोठडी आहे. त्यामुळे अधिक चौकशी करून लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी तपास चालविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT