mamta banarjee 
देश

सुवेंदू अधिकारी X ममता बॅनर्जी, गुरुवारी हायकोर्टात सुनावणी

विश्वास पुरोहित

कोलकाता हायकोर्टात शुक्रवारी ममता बॅनर्जी यांच्या याचिकेवर सुनावणी झाली.

कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघात झालेल्या पराभवाविरोधात ममता बॅनर्जींनी कोलकाता हायकोर्टात धाव घेतली आहे. नंदीग्राममधील निकालाला ममता बॅनर्जींनी आव्हान दिले असून या याचिकेवर गुरुवारी (२४ जून) सुनावणी होणार आहे.

कोलकाता हायकोर्टात शुक्रवारी ममता बॅनर्जी यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावतीने सौमेंद्रनाथ मुखर्जी यांनी हायकोर्टात बाजू मांडली. न्यायाधीश चंदा यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी झाली. हायकोर्टात सुनावणीला सुरूवात होताच ममता बॅनर्जी यांच्या वकिलांनी पुढील तारीख देण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने विनंती मान्य करत गुरुवारची तारीख दिली.

पश्चिम बंगालमधील निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा १, ९५६ मतांनी पराभव केला होता. तीन दशकात पहिल्यांदाच ममता बॅनर्जींना पराभवाचा सामना करावा लागला.

ममता बॅनर्जी यांनी ३ मे रोजी निकालानंतर पत्रकार परिषद घेत मतमोजणीबाबत आक्षेप घेतला होता. आम्ही या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करू, असे त्यांनी म्हटले होते. यानुसार ममता बॅनर्जी यांच्या वतीने कोलकाता हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत मतमोजणी योग्यपद्धतीने करण्यात आली नाही, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT