Nandini Milk CM Siddaramaiah esakal
देश

Nandini Milk : बहुचर्चित नंदिनी दूध दरात 'इतक्या' रुपयांनी होणार वाढ; मुख्यमंत्र्यांसोबत महामंडळाची चर्चा

राज्य सरकारला दुधाच्या दरात वाढ करण्याची विनंती केली जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

दरवाढीची गरज मुख्यमंत्र्यांना पटवून देण्याचा निर्णय बैठकीत घेतला असून तो लवकरच जाहीर केला जाणार आहे.

बेळगाव : अन्नभाग्य योजना लागू झाल्यावर कर्नाटक दुग्ध महामंडळाने (Karnataka Milk Development Corporation Limited KMF) नंदिनी दुधाच्या दरात लिटरमागे पाच रुपयांनी वाढ करण्याची तयारी केली असून, दरवाढीचा फटका ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे.

सोमवारी (ता. १०) राज्य सरकार अन्नभाग्य योजना अधिकृतपणे सुरू करणार आहे. त्यानंतर मंगळवारी (ता. ११) नंदिनीचे (Nandini Milk) संचालक मंडळ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करतील. राज्य सरकारला दुधाच्या दरात वाढ करण्याची विनंती केली जाणार आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रस्तावना मंजुरी देतातच संचालक मंडळाकडून अंतिम निर्णय जाहीर केला आहे. काल (ता. ६) सायंकाळी केएमएफचे अध्यक्ष भीमा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत दुधाचे दर प्रतिलिटर पाच रुपयांनी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला.

राज्यातील सर्व दूध संघांनी प्रतिलिटर दुधाचा दर ५ रुपये वाढविण्याची मागणी केली असेल, त्यानुसार केएमएफ शासनाकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठविला आहे. दरवाढीची गरज मुख्यमंत्र्यांना पटवून देण्याचा निर्णय बैठकीत घेतला असून तो लवकरच जाहीर केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT