Narayan-Rane
Narayan-Rane 
देश

भाजपच्या समितीमध्ये नारायण राणे

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा निर्मिती आणि प्रभावी प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी भाजपने जाहीर केलेल्या समितीमध्ये खासदार नारायण राणे यांचा समावेश करण्यात आला आहे. यानिमित्ताने त्यांचे पुनर्वसन केल्याचे मानले जात आहे. 

भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी समित्यांची घोषणा केली आहे. ‘संकल्पपत्र’ या नावाने जाहिरनामा तयार करण्यासाठी गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासोबतच राणे यांचा समावेश आहे. तर अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याअध्यक्षतेखाली प्रचार-प्रसार समिती नेमली आहे. भाजपने सामाजिक संस्थांशी संपर्क वाढविण्याचेही उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठीच्या समितीचे प्रमुखपद परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले आहे. तर सुषमा स्वराज यांच्याकडे पक्ष प्रचाराचे साहित्य तयार करण्यासाठीचे नेतृत्व दिले आहे. समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींशी संपर्कासाठी प्रकाश जावडेकर यांचा समावेश असलेल्या ‘प्रबुद्ध संमेलन’ समितीसह १७ समित्या देखील नेमण्यात आल्या आहेत. 

भाजपच्या संकल्पपत्र समितीमध्ये राजनाथसिंह, अरुण जेटली, निर्मला सीतारामन, राणे यांच्यासह वीस जण आहेत. प्रचार-प्रसार समितीमध्ये अरुण जेटलींसोबत आठ जण, तर गडकरींच्या नेतृत्वाखालील सामाजिक स्वयंसेवी संघटना संपर्क समितीमध्ये १४ जण आहेत. सुषमा स्वराज यांच्यासोबत विनय सहस्त्रबुद्धे, अनुराग ठाकूर, प्रभात झा, महेश शर्मा असतील. प्रसारमाध्यम समितीचे कामकाज रवीशंकर प्रसाद पाहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT