Narendra Modi
Narendra Modi 
देश

'मुलाखतीमध्ये फक्त मोदींचा 'मी'पणा होता'

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीवर कॉंग्रेसने "डोंगर पोखरून उंदीर निघाला', अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच निवडणूक काळात मोदींनी दिलेल्या आश्‍वासनांचे काय झाले, असा प्रश्‍न उपस्थित करताना सरकारची उलटगणती सुरू झाल्याचा इशाराही दिला आहे. 

कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीनंतर लगेचच पत्रकार परिषद घेऊन तोफ डागली. 90 मिनिटांच्या मुलाखतीमध्ये फक्त मोदींचा "मी'पणा होता. या "मी'पणामुळेच देशाची पीछेहाट झाली आहे. पंतप्रधानांनी 2019 ची सुरवातच "मी, माझे आणि माझ्यासाठी' याने केली आहे. मात्र त्यांच्या सरकारचे आता केवळ 100 दिवस उरले असून उलटगणती सुरू झाली आहे, असा चिमटा सुरजेवाला यांनी काढला. 

मोदी त्यांच्या आश्‍वासनांच्या पूर्ततेवर बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी या सर्व मुद्द्यांना बगल दिल्याचे टिकास्त्रही सुरजेवाला यांनी सोडले. जनतेच्या बॅंक खात्यामध्ये 15 लाख आले काय, 80 लाख कोटी रुपये काळा पैसा शंभर दिवसांत येण्याची घोषणा होती, मागील 55 महिन्यांमध्ये एक तरी रुपया आला काय, दर वर्षी दोन कोटी रोजगार या नात्याने 55 महिन्यांत नऊ कोटी रोजगार निर्मिती अपेक्षित होती. नऊ लाख रोजगार तरी निर्माण झाले काय, अशी प्रश्‍नांची फैर त्यांनी झाडली. 

सुरजेवाला म्हणाले, की शेतीमालाला किमान दरही मिळाला नाही, उद्योग व्यवसाय प्रक्रिया सुटसुटीत करण्याचे आश्‍वासन असताना जीएसटीसारखा गब्बरसिंग टॅक्‍स लावून व्यवसाय बुडवले, नोटाबंदीमध्ये काळा पैसा बाळगणाऱ्यांची चांदी झाली आणि सर्वसामान्यांचे हाल झाले, याचे उत्तर मोदी देतील काय, राष्ट्रीय सुरक्षेशी खेळखंडोबा होऊन 55 महिन्यांत 458 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. भ्रष्टाचार गगनाला भिडला असून 30 हजार कोटी रुपयांच्या "राफेल' व्यवहारात काही चूक नसेल तर जेपीसीला विरोध का आहे, असा प्रश्‍न त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

SCROLL FOR NEXT