Narendra Modi Esakal
देश

PM Modi: 'गरीबी हटाओ'च्या घोषणेने काँग्रेसने निवडणुका जिंकल्या पण...

भारताच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे गरजेचे; नरेंद्र मोदी

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : 'गरीबी हटाओ' या घोषणेमुळे काँग्रेसने अनेक निवडणुका जिंकल्या पण त्यात त्यांना अपयश आले. एवढ्या निवडणुका हरल्यानंतर काँग्रेसच्या (Congress) अहंकारात कोणताही बदल झालेला नाही असा निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी काँग्रेसला लगावला. ते संसदेच्या सभागृहात बोलत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसने जेव्हा 'गरीबी हटाओ'चा नारा लगावला होता तेव्हा देशातील गरीब जनतेने त्यांना मतदान केले. त्या आधारवर ते निवडून आले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. कोरियन युद्धामुळे तसेच अमेरिकेतील अशांततेमुळे महागाई वाढली असे पंडित नेहरू (Jawaharlal Nehru) म्हणाले होते असेही मोदी म्हणाले.

काँग्रेसवर टिका करताना मोदी म्हणाले, ज्यांनी देशावर एवढी वर्षे राज्य केले,जे राजेशाही थाटात राहिले त्यांनी छोट्या शेतकर्‍यांचा कधी विचार केला नाही, कधीही शेतकरी हिताची चर्चा केली नाही. भारताच्या प्रगतीसाठी, गरिबीतून मुक्ती मिळवण्यासाठी लहान शेतकऱ्यांना सक्षम करणे गरजेचे आहे. हेच शेतकरी देशाच्या प्रगतीला बळ देतील. छोटा शेतकरी सक्षम बनला तर छोट्या जमिनीचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न तो नक्कीच करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT