Nawab Malik sakal media
देश

अगोदर मोदींनी आपल्या नावाच्या स्टेडियमचे नाव बदलावे: नवाब मलिक

विनायक होगाडे

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारला आपल्या सत्ताकाळात नाव बदलण्यापलीकडे राजकारण जमलेले नाही. त्यामुळे ते जुन्या योजना, इमारती आणि काँग्रेसच्या नेत्यांची आदींचे नाव बदलत आहेत. त्यांना ही नावे बदलण्याचे नैतिक अधिकार नाहीत, तरीही त्यांनी अगोदर अहमदाबाद येथील मोदी स्टेडियमचे नाव बदलून ते ध्यानचंद यांचे द्यावे, असे आव्हान अल्पसंख्यांक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केले. कॉफी विथ सकाळच्या कार्यक्रमात त्यांनी राजकीय आणि विविध सामाजिक प्रश्नावर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आणि सडेतोडपणे उत्तरेही दिली.

यावेळी मलिक म्हणाले की राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण खेलरत्न ध्यानचंद पुरस्कार करण्याचा मोदी सरकारने निर्णय घेतला, जर काँग्रेसच्या दिवंगत नेत्यांची नावे बदलली जात असतील तर अहमदाबादच्या मोदी स्टेडीयमचे नाव बदलून टाकावे. एकीकडे स्वतःचे नाव द्यायचे आणि दुसरीकडे दुसऱ्याचे नाव बदलायचे असे नाव बदलण्याचा नैतिक अधिकार भाजपाला नाही. या शब्दात नवाब मलिकांनी केंद्र सरकारवर टीका केली.

भाजप सरकार केंद्रात जेव्हा सत्तेत आले होते तेव्हा देणे 500 स्मार्ट स्मार्ट सिटी तयार करण्याची बोलले होते, तीही त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी आता स्मार्ट सिटी वर ऑनलाईन सेवा निर्माण करण्याची सुरू केले, परंतु त्यांना नवीन काहीच करता आले नाही म्हणून ते आता नावे बदलणे या पलिकडे दुसरे काहीच करत नाहीत, असा टोलाही मलिक यांनी यावेळी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT