Rahul Gandhi meets Narendra Modi ESakal
देश

Narendra Modi on Rahul Gandhi : 'विरोधी पक्षात असे काही नेते आहेत, जे राहुल गांधींपेक्षा चांगले बोलतात, परंतु...’’

PM Narendra Modi targets Rahul Gandhi: पंतप्रधान मोदींनी लगावला टोला; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत मोदी?

Mayur Ratnaparkhe

PM Narendra Modi’s remarks on Opposition leadership: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.  लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी चहापानाचे आयोजन केले होते. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांसह एनडीए नेते चहापानाला उपस्थित होते. परंतु विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह एकही विरोधी खासदार उपस्थित नव्हता.

तर यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधींवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की, विरोधी पक्षातील अनेक नेते प्रतिभावान आणि चांगले वक्ते आहेत, परंतु राहुल गांधींमुळे त्यांना बोलण्याची संधी मिळत नाही. पंतप्रधानांनी अनौपचारिकपणे सांगितले की काँग्रेस पक्ष व्यत्यय आणतो कारण विरोधी पक्षात असे काही नेते आहेत जे राहुल गांधींपेक्षा चांगले बोलतात आणि त्यांना हे नकोय.

चहापान दरम्यान पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, विरोधी पक्षाचे खासदारांना संसदेच्या कामकाजात व्यत्यत आणण्यासाठी भाग पाडले जाते कारण ते राहुल गांधींपेक्षा चांगले वक्ते आहेत.  परंतु लोकसभेत विरोधी पक्ष नेते त्यांना प्रोत्साहन देऊ इच्छित नाहीत. संसदेच्या कामकाजात विरोधी पक्षाच्या खासदारांकडून नियमितपणे व्यत्यत टाकले आणला जातो.

गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. पावसाळी अधिवेशनात कामकाजात व्यत्यय कायम ठेवल्याबद्दल लोकसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षांबद्दल नाराजी व्यक्त केली आणि सांगितले की नियोजनबद्ध पद्धतीने सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणण्यात आला. जो लोकशाही आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेला अनुसरून नाही. अठराव्या लोकसभेचे पाचवे अधिवेशन २१ जुलै रोजी सुरू झाले, ज्यामध्ये १४ सरकारी विधेयके सादर करण्यात आली आणि १२ विधेयके मंजूर करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Dombivali News : दिवा स्वतंत्र पोलीस ठाण्याचा विषय मार्गी लावा; मनसे नेते राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

SCROLL FOR NEXT