देश

Narendra Modi: केंद्रातील मोदी सरकार कधी पडणार? काँग्रेसच्या बड्या नेत्याने मुहूर्तच सांगितला !

Political News: शेतकरी विरोधी तीन कायदे परत घ्यावे लागले देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सकाळ वृत्तसेवा

मोदींकडे बहुमत नसून नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या भरवशावर केंद्र सरकार टिकून आहे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर केंद्रात देखील सत्ता परिवर्तन होणार असल्याचा दावा महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेचे प्रभारी रमेश चैनिथला यांनी ता.१२ सोमवारी भोकरदन शहरात आयोजित काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी केले.

पुढे ते म्हणाले की,राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभर फिरले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारण केल्यामुळेच अयोध्येत इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून आला,महाराष्ट्रात आज सर्वात जास्त खासदार काँग्रेसचे आहे.शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने काहीच केले नाही म्हणून त्यांना शेतकरी विरोधी तीन कायदे परत घ्यावे लागले देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भोकरदन येथील काँग्रेस पक्ष संपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ व भव्य कार्यकर्ता मेळावा ता.12 सोमवारी रात्री आठ वाजता शहरातील सिल्लोड रोड वरील किरण पी देशमुख पेट्रोल पंप शेजारी संपन्न झाला या कार्यक्रमास काँग्रेस विधिमंडळ नेते आ.बाळासाहेब थोरात,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,माजी मंञी सतेज पाटील,जालन्याचे खासदार डाॅ.कल्याण काळे,परतुरचे माजी आमदार सुरेशकुमार जैथलिया,वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र राख,नाना गावंडे,महेमुद शेख,जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख उपस्थित होते. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली

कल्याण काळे यांना विजयी करून जालन्याला लागलेली कीड काढली असे ते म्हणाले,विलासरावांच्या कार्याचा उल्लेख त्यांनी केला.आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आमदार संतोष दानवेंचा पराभव राजाभाऊ देशमुख करतील यांची मला पुर्ण खाञी आहे असे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात माजी नगराध्यक्ष मंजुषा देशमुख यांचे कौतुक केले तर भोकरदनची जागा काँग्रेस पक्षाकडे घेण्यासाठी आम्ही वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.

या कार्यक्रमास युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख,माजी नगराध्यक्षा मंजुषा देशमुख,किरण डोणगावकर,अक्षय गोरंट्याल,इंद्रजीत देशमुख,सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष सोपान सपकाळ,माजी नगरसेवक संतोष अन्नदाते,भोकरदनचे तालुका अध्यक्ष ञिबंकराव पाबळे जाफराबाद तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे,बबनराव देशमुख,आण्णासाहेब खंदारे,बाबासाहेब घाडगे,वसंत राजे जाधव,सुभाष मगरे,अनिल देशपांडे,सुरेश गवळी,विजय इंगळे,रमेश जाधव,एजाज पठाण,संतोष अन्नदाते,श्रावण आक्से,राजुशेठ देशमुख,समाधान देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सुञसंचालन राहुल देशमुख तर सोपान सपकाळ यांनी आभार मानले. प्रास्ताविकात काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी भोकरदन मतदार संघ हा पारंपारिक काँग्रेसचा गड होता लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसला येथे मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळाले त्यामुळे भोकरदन विधानसभा मतदासंघ काँग्रेसला सोडण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT