देश

माझ्या मुलांना भारतात ठेवायला भीती वाटते- नसरुद्दीन शहा

वृत्तसंस्था

मुंबई: समाजात मोठ्या प्रमाणावर विष पसरले आहे. यामुळे माझ्या मुलांना भारतात ठेवायला भीती वाटत असल्याचे विधान अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती. त्या घटनेवर शहा यांनी भाष्य केलं आहे. भारतातील सद्यस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. 

3 डिसेंबरला बुलंदशहरात गोहत्येवरुन तणाव निर्माण झाला होता. यावरून बोलताना त्यांनी म्हटले आहे की, आता गाईचा जीव माणसाच्या जीवापेक्षा महत्त्वाचा झाला आहे, असंही ते म्हणाले. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावानं हल्ला केला. यामध्ये पोलिस निरीक्षकासह एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल बोलताना नसरुद्दीन शहांनी देशातील घडामोडींवरही भाष्य केलं. 'देशातील सध्याच्या परिस्थितीचा मला प्रचंड राग येतो. मला माझ्या मुलांची चिंता वाटते,' असं शहांनी म्हटलं. त्यांनी माध्यमांशी बोलताना अशी चिंता व्यक्त केली आहे.

गाईचे प्राण पोलिस अधिकाऱ्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहेत. समाजात विष पसरलं आहे. या परिस्थितीची मला खूप भीती वाटते. अचानक जमावानं माझ्या मुलांना घेरलं आणि तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम असा प्रश्न त्यांना विचारला, तर काय होईल', अशा शब्दांत देशातील परिस्थितीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की, देशातील सध्याच्या परिस्थितीचा चीड येते, लोकांनादेखील याबद्दल संताप वाटला पाहिजे. हे आमचं घर आहे आणि यातून कोण आम्हाला बाहेर काढू शकतो, असा विचार लोकांच्या मनात यायला हवा,' असेही शहा यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दशावतारची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच ! अक्षयच्या जॉली एलएलबी 3ला जबरदस्त टक्कर; कमावले इतके कोटी

Mumbai Local Megablock: रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक! लोकल फेऱ्यांमध्ये अनेक बदल, पाहा वेळापत्रक

Pakistan Troll : इतका कडक गांजा कुठून मिळतो? पाकिस्तानमध्ये स्वत:चं मृत्यू प्रमाणपत्र घेण्याचा पर्याय; जगभरात ट्रोलिंग, मीम्सचा पाऊस

VHP : ''गरबा फक्त हिंदूसाठी, मुस्लीम तरुण गरब्यात आल्यास पोलीसांच्या ताब्यात देऊ'', विश्वहिंदू परिषदेच्या आयोजकांना सुचना...

Latest Marathi News Live Update : अमेरिकेचं नुकसान भारताच्या फायद्याचं ठरेल, H1 व्हिसा शुल्कावर अमिताभ कांत यांचं मत

SCROLL FOR NEXT