Madrasa Board Examination esakal
देश

मदरशांच्या शाळेत यापुढे 'राष्ट्रगीत' असणार बंधनकारक : मदरसा बोर्ड

सकाळ डिजिटल टीम

राज्य सरकारनं मदरशांमध्ये विज्ञान आणि गणितासह संगणक शिक्षण सक्तीचं केलं होतं.

मदरशांच्या (Madrasa) शाळेबाबत उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. आता राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांतील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रापासून वर्ग सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत (National Anthem) म्हणणं बंधनकारक असणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार, मदरशांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी टीईटीच्या (TET) धर्तीवर शिक्षक भरतीकरता (Teacher Recruitment) मदरसा शिक्षक पात्रता परीक्षा (MTET) देखील सुरू करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आठवीपर्यंतच्या परीक्षेत विज्ञान, इंग्रजी आणि गणिताच्या प्रश्नांचाही समावेश केला जाणार आहे.

वास्तविक, मदरसा शिक्षण परिषदेचे (Madrasa Education Council) अध्यक्ष डॉ. इफ्तिखार अहमद जावेद यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत मदरशांच्या संदर्भात मुदतवाढ देण्यात आलीय. ज्यात नवीन सत्रापासून वर्ग सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत देखील बंधनकारक असणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉ. जावेद म्हणाले, बोर्डाचे रजिस्ट्रार लवकरच एमटीईटीबाबत सरकारला प्रस्ताव पाठवतील. जेणेकरून मदरशांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसाठी काही रुपरेषा तयार करता येतील. मदरशांमधील विद्यार्थ्यांची घटती संख्या पाहता अनुदानित मदरशांमध्ये शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर तपासण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासोबतच विद्यार्थ्यांच्या गुणोत्तरापेक्षा जास्त शिक्षक असल्यास शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार असून, आता मदरशांमध्येही बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

यासोबतच मदरसा बोर्डाच्या परीक्षा (Madrasa Board Examination) 14 ते 27 मे या कालावधीत होणार असल्याचं परिषदेच्या अध्यक्षांनी सांगितलंय. सध्या मूलभूत शिक्षण परिषदेच्या धर्तीवर इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षेत हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयांचा अभ्यासक्रमात समावेश केला जाणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकार मदरशांमध्ये आधुनिक शिक्षण देण्यावर भर देत आहे. राज्य सरकारनं मदरशांमध्ये विज्ञान आणि गणितासह संगणक शिक्षण सक्तीचं केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 नंतर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला मुक्त करणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या...

Mumbai News: पुनर्विकासात मोठा गेमचेंजर! वरच्या मजल्यावरील रहिवाशांना घर मिळणार, पण अट तळमजल्याच्या पात्रतेची

Kishori Pednekar: केवळ १५०० रुपयांनी महिलांना संरक्षण मिळणार नाही, किशोरी पेडणेकर यांची टीका

उष्णतेत नागरिकांना मोठा फटका! मुंबईत ६ प्रभागांमध्ये ३० तास पाणीपुरवठा बंद; कोणत्या आणि कधी? वाचा यादी...

IPL 2026: "काका, काळजी नको, पुढच्या वेळी हेल्मेट देऊ!" प्रिती झिंटाने जखमी चाहत्याची चौकशी करताना केली थट्टा; Video Viral

SCROLL FOR NEXT