Motilal Vora_Congress
Motilal Vora_Congress 
देश

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी मोतिलाल व्होरांविरोधात पुरावे नाहीत : ईडी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉर्ल्ड केसनं सध्या काँग्रेस हायकमांड चांगलेच अडचणीत आले आहेत. राहुल गांधी आणि आता सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये काँग्रेसचे खजिनदार म्हणून सर्वाधिक काळ काम पाहिलेले दिवंगत मोतिलाल व्होरा यांच्याकडेही संशयाची सुई येत होती. पण त्यांचा या घोटाळ्यातील आर्थिक व्यवहारांमध्ये सहभाग असल्याचे पुरावे नाहीत, असं ईडीच्या सूत्रांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (National Herald case No proof of Motilal Vora handling financial transactions say ED)

राहुल गांधी यांची जेव्हा ईडीकडून चौकशी सुरु होती तेव्हा त्यांना आर्थिक बाबींबाबत प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की, काँग्रेसचे सर्व आर्थिक व्यवहार मोतिलाल व्होरा पाहत होते. राहुल यांच्यानंतर सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि पवन कुमार बन्सल यांनी देखील व्होरा यांचंच नाव घेतलं होतं. पण यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात हे सर्व नेते अपयशी ठरले.

मोतीलाल व्होरा त्यावेळी AICC चे खजिनदार होते आणि AJL प्रकरणांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. जानेवारी 2008 मध्ये एजेएल समूहाचे नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र बंद झाल्याचे घोषित करणाऱ्या करारावर त्यांनी सह-स्वाक्षरीही केली होती. खर्गे यांना संसदेचं अधिवेशन सुरु असतानाच चौकशीसाठी बोलावण्यात आलं कारण, त्यांना आत्ताच बोलावण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण यंग इंडियन या कंपनीतील खर्गे हे एकमेव कर्मचारी आहेत, असं स्पष्टीकरण ईडीनं दिलं होतं.

दरम्यान, भाजप नेते आणि अॅड. सुब्रमण्यम स्वामी यांनी सन २०१२ मध्ये यासंदर्भात कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांनी आरोप केला होता की, काँग्रेस नेत्यांचा फसवणूक प्रकरणात सहभाग आहे. यंग इंडियन लिमिटेडद्वारे (YIL) असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या अधिग्रहणामध्ये विश्वास कराराच्या अटींचा भंग झाला होता. स्वामी यांनी असाही दावा केला होती की, YIL ने 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा नफा आणि मालमत्ता मिळविण्यासाठी बंद पडलेल्या नॅशनल हेरॉल्डची मालमत्ता ताब्यात घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT