national investigation agency arrested congress late mla bm idinabba kin suspected isis links  
देश

इसिस कनेक्शन, काँग्रेसच्या माजी आमदाराच्या नातेवाईकाला अटक

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) अधिका-यांना सोमवारी अब्दुल दीप्ति मारला यांना इस्लामिक स्टेटशी (IS) कथित संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दीप्ती मारला उर्फ ​​मरियम या कर्नाटक काँग्रेसचे माजी आमदार बी. एम. इदिनाब्बा(B M Idinabba) यांचे नातू अब्दुल रहमान यांची पत्नी आहेत.

NIA ने कर्नाटक पोलिसांच्या मदतीने ISIS शी संबंध असल्याप्रकरणी दीप्ती मारला उर्फ ​मरियम, अनस अब्दुल रहिमान यांना अटक केली असल्याचे NIA ने एका निवेदनात म्हटले आहे. अनस अब्दुल रहिमन हे मारला यांचे पती आणि बी.एम. बाशा यांचे चिरंजीव आहेत, बाशा यांचे वडील इदिनाबा एकेकाळी काँग्रेसचे आमदार होते. 2009 मध्ये इदिनाब्बा यांचे निधन झाले आहे. तसेच यापूर्वी एनआयएने याप्रकरणी अनसचा भाऊ अममार याला अटक केली होती.

तपासादरम्यान, हे उघड झाले आहे की सीरिया/इराकमध्ये ISIS पडावानंतर दीप्ती मारला आणि मोहम्मद आमीन हिजराह साठी तसेच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी मार्च 2020 मध्ये काश्मीरला भेट दिली होती. मोहम्मद आमीनसह दीप्ती मारला ही आयएसआयएस (ISIS) च्या कटाची मुख्य सूत्रधार होती, असे एनआयएने एका निवेदनात म्हटले आहे. आत्तापर्यंत, NIA ने आतापर्यंत 11 लोकांना निधी गोळा करणे, प्रशिक्षण देणे आणि लोकांना ISIS मध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करणे या आरोपाखाली अटक केली आहे. गेल्या वर्षी 4 ऑगस्ट रोजी, जम्मू-कश्मीर आणि कर्नाटकमधील पाच ठिकाणी शोधमोहिम राबवण्यात आली आणि इस्लामिक स्टेटसाठी निधी गोळा करणे आणि भरती केल्याच्या आरोपाखाली अम्मारसह चार लोकांना अटक केली.

2016 मध्ये IS मध्ये सामील होण्यासाठी देश सोडून गेलेल्या केरळमधील कासारगोड येथील 13 लोकांमध्ये अम्मारची भाची असल्याचे मानले जाते. जानेवारी 2017 मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात एनआयएने अजमला आणि तिचा पती शिफास केपी हे बेंगळुरू येथून भारत सोडून गेल्याचा संशय व्यक्त केला, तसेच ते 24 मे 2016 रोजी अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात IS मध्ये सामील झाले. सूत्रांनुसार आतापर्यंत एकूण 21 लोकांनी IS मध्ये सामील होण्यासाठी केरळ सोडले असल्याचे समोर आले आहे.

NIA ने गेल्या वर्षी 5 मार्च रोजी IPC आणि UAPA च्या विविध आरोपाखाली सात ज्ञात आणि इतर अनोळखी लोकांविरुद्ध स्वतःहून गुन्हा नोंदवला होता. मोहम्मद अमीन आणि त्याचे सहकारी आयएस विचारधारेचा प्रचार करण्यासाठी आणि सदस्यांची भरती करण्यासाठी टेलिग्राम, हूप आणि इंस्टाग्राम सारख्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचार चॅनेल चालवत असल्याचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women’s World Cup Final : आधी पराभव बघितले...आता इतिहास घडवण्याची वेळ; फायनलसाठी तयार हरमन ब्रिगेड, किती वाजता सुरु होईल सामना?

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' बनवणाऱ्या महेश मांजरेकरांना महाराजांबद्दल विचारले ४ प्रश्न; काय दिली उत्तरं? तुम्ही ठरवा योग्य की अयोग्य

Mumbai: महिलेचा स्कर्ट ओढणे आणि शिट्टी वाजवणे हा गुन्हाच...! मुंबईतील न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपीला सुनावली 'अशी' शिक्षा

Women’s World Cup Final : विश्वकप जिंकल्यास महिला क्रिकेटपटूंना मिळणार कोट्यवधींचं बक्षीस? नेमकी कुणी दिली ऑफर? वाचा...

Crime: स्वतःला देव समजणारा राक्षस! ३५० जणांना संपवलं, ११० अल्पवयीन मुलींचा समावेश, कारण... वाचा सर्वात कुख्यात सिरीयल किलरची कहाणी

SCROLL FOR NEXT