Shinzo Abe 
देश

उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर; भारत अबेंप्रती व्यक्त करणार आदरभाव

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांची जपानमध्ये एका सार्वजिनक सभेदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांची जपानमध्ये एका सार्वजिनक सभेदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यामुळं जगभरात खळबळ उडाली आहे. अबे हे भारताचे शुभचिंतक आणि मित्र म्हणून ओळखले जातात. त्यामुळंच अबे यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी भारतात उद्या, ९ जुलै रोजी एक दिवशीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. (national mourning Declare tomorrow India will show respect to Shinzo Abe)

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंजो अबे यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत श्रद्धांजली वाहिली. तसेच उद्या ९ जुलै २०२२ रोजी देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. याद्वारे जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्याप्रती आपण मनापासून आदरभाव व्यक्त करत आहोत, असंही PM मोदींनी म्हटलं आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर एका भाषणादरम्यान पश्चिम जपानमधल्या नारा शहरामध्ये गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरानं त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या, या घटनेत गंभीर जखमी झाल्यानं अबे यांची प्रकृती चिंताजनक होती. पण काही तासांनंतर त्यांचं निधन झालं.

या संशयिताने भाषणादरम्यान मागच्या बाजूने गोळी झाडल्याचं सांगण्यात येत आहे. या संशयित हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची बंदूकही जप्त कऱण्यात आली आहे. हा हल्लेखोर ४० वर्षांचा आहे. शिंजो अबे यांचे भारताशी घनिष्ट संबंध आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात चारवेळा भारताला भेट दिली आहे. शिंजो अबे ६७ वर्षांचे असून आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT