NEET Medical Exam Centre in Kerala esakal
देश

NEET Exam : 'त्या' विद्यार्थिनींना मिळणार पुन्हा परीक्षा देण्याची संधी; NTA नं केलं स्पष्ट

परीक्षा केंद्रात अल्पवयीन मुलींना अंडरवेअर काढण्यास भाग पाडण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

परीक्षा केंद्रात अल्पवयीन मुलींना अंडरवेअर काढण्यास भाग पाडण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता.

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये परीक्षेपूर्वी (NEET Medical Exam Centre in Kerala) मुलींची तपासणी करण्याच्या नावाखाली त्यांना अंडरवेअर काढण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली. वैद्यकीय प्रवेशासाठी रविवारी देशभरात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेला (NEET) बसलेल्या एका विद्यार्थिनीनं आरोप केलाय की, 'तिला परीक्षा केंद्रावर इनरवेअर काढण्यास सांगण्यात आलं होतं.'

परीक्षा केंद्रावर विद्यार्थिनीसोबत झालेल्या या असभ्य वर्तनामुळं पालक संतप्त झाले असतानाच, मुलीला प्रचंड मानसिक छळातून जावं लागलं होतं. सोमवारी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. काही विद्यार्थ्यांनी याविरोधात निदर्शनंही केली होती. दरम्यान, केरळमधील NEET वैद्यकीय परीक्षा केंद्रात (National Testing Association) अल्पवयीन मुलींना अंडरवेअर काढण्यास भाग पाडण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. नॅशनल टेस्टिंग असोसिएशननं (एनटीए) सांगितलं की, त्या मुलींसाठी NEET परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात येईल, असं स्पष्ट केलंय.

मुलींना 4 सप्टेंबर रोजी परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आलाय. एनटीएनं विद्यार्थ्यांना याची पुष्टी करणारा ईमेलही पाठवला आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी तरुण मुलींना त्यांचे इनरवेअर काढण्यास सांगण्यात आल्याचं वृत्त समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

जुलैमध्ये एका व्यक्तीनं कोट्टारकरा पोलिसांकडं (Kottarakara Police) तक्रार दाखल केली आणि सांगितलं की, NEET परीक्षार्थींना चथामंगलम (Chathamangalam) परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी त्यांना ब्रा काढण्यास सांगण्यात आलं होतं. या घटनेबद्दल संताप आणि व्यापक निषेधानंतर, मानवाधिकार आयोगानं कोल्लम ग्रामीण एसपींना या प्रकरणाची चौकशी करून 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT