Nationality v/s Citizenship  google
देश

Nationality v/s Citizenship : राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्व यांत फरक काय ?

राष्ट्रीयत्व हे वैयक्तिक सदस्यत्व आहे जे एखाद्या व्यक्तीच्या राज्याशी संबंध दर्शवते. दुसरीकडे नागरिकत्व ही राजकीय स्थिती आहे.

नमिता धुरी

मुंबई : भारतीय राज्यघटना भाग II अंतर्गत कलम ५ ते ११ नागरिकत्वाशी संबंधित आहे. नागरिकत्व कायदा, १९९५ नागरिकत्व मिळविण्यासाठी ५ कारणे देतो. जन्म, वंश, नोंदणी इत्यादी ती कारणे आहेत.

बर्‍याचदा आपण नागरिकत्व आणि राष्ट्रीयत्व दोन्ही सारखेच समजतो. परंतु तुम्हाला माहीत आहे का की, दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे. होय, जेथे एखाद्या व्यक्तीचे जन्मस्थान त्याचे राष्ट्रीयत्व सांगते, तर नागरिकत्व देशाच्या सरकारद्वारे प्राप्त केले जाते. त्यांच्यातील फरक समजून घेऊ या.

राष्ट्रीयत्व म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तीचे राष्ट्रीयत्व त्याचे जन्मस्थान प्रकट करते, म्हणजेच राष्ट्रीयत्व दर्शवते की व्यक्तीचा जन्म कुठे झाला.

नागरिकत्व म्हणजे काय?

दुसरीकडे देशाचे सरकार कायदेशीर औपचारिकता पाळल्यानंतर एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व देते.

राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्व यांतील फरक

१.- राष्ट्रीयत्व हे वैयक्तिक सदस्यत्व आहे जे एखाद्या व्यक्तीच्या राज्याशी संबंध दर्शवते. दुसरीकडे नागरिकत्व ही राजकीय स्थिती आहे, ज्यामुळे व्यक्ती देशाची नागरिक म्हणून ओळखली जाते.

२.- राष्ट्रीयत्व हे व्यक्तीच्या जन्मस्थानाचे प्रतिनिधित्व करते तर, नागरिकत्वामध्ये देशाच्या सरकारद्वारे नागरिक म्हणून नोंदणी केली जाते.

३.- राष्ट्रीयत्वाची संकल्पना नैतिक किंवा वांशिक आहे तर, नागरिकत्वाची संकल्पना कायदेशीर स्वरूपाची आहे.

४.- जिथे एखाद्या व्यक्तीचे राष्ट्रीयत्व जन्म आणि वंशानुसार मिळू शकते, तिथे नागरिकत्व जन्म, वारसा, नैसर्गिकीकरण, विवाह इत्यादीद्वारे मिळू शकते.

५.- एखाद्या व्यक्तीचे राष्ट्रीयत्व बदलता येत नाही तर ती व्यक्ती आपले नागरिकत्व बदलू शकते.

६.- एखाद्या व्यक्तीचे राष्ट्रीयत्व फक्त एकाच देशाचे असते तर एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त देशांची नागरिक बनू शकते.

७.- राष्ट्रीयत्व बदलता येत नाही तर नागरिकत्व बदलता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 मिळतोय निम्म्या किंमतीत! ४४ हजारात खरेदीसाठी रांगा; कुठे सुरुय ही अजब ऑफर? पाहा एका क्लिकवर

Solapur Hyderabad Flight : सोलापूरकरांसाठी गूड न्यूज! 17 एप्रिलपासून विमान प्रवासाचं गणित बदलणार; पहा नवीन वेळापत्रक

'कमळी' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री; म्युझिक टिचर बनून येतेय सगळ्यांना वेड लावणारी गायिका, चाहते खुश

Yuvraj Singh: 'धोनी अचानक आला, भारताचा कॅप्टन झाला, त्यावेळी मी...', युवराजचं थेट भाष्य; निवृत्तीबाबतही केला धक्कादायक खुलासा

Shaktipith Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून पुन्हा एल्गार, सतेज पाटील, राजू शेट्टींच्या सोबतीने शेतकरी ताकद दाखविणार

SCROLL FOR NEXT