देश

Video : पहिल्या स्वदेशी अ‍ॅन्टीशीप क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने आपली ताकद आणखी वाढवली असून, बुधवारी नौदलाने पहिल्या स्वदेशी विकसित अ‍ॅन्टीशीप मिसाईल क्षेपणास्त्राची (Antiship Missile Test Successful) यशस्वी चाचणी केली आहे. ट्विटरवर भारतीय नौदलाने सीकिंग 42 बी हेलिकॉप्टरने क्षेपणास्त्र डागण्याचा एक छोटा व्हिडिओ ट्विट केले आहे. (Antiship Missile Test Successful)

"विशिष्ट क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या दिशेने ही चाचणी एक महत्त्वाचे पाऊल असून, ही चाचणी भारतीय नौदलाच्या (Indian Navy) स्वदेशीकरणाला दुजोरा देते'', असे मत नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. DRDO च्या सहकार्याने, ही चाचणी बालासोर, ओडिशा येथील एकात्मिक चाचणी श्रेणी येथे ही चाचणी करण्यात आली. सीकिंग 42बी हेलिकॉप्टरमधून स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राचे चाचणी यशस्वीपणे करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेक इन इंडिया 'INS सुरत' अन् 'INS उदयगिरी' लॉन्च

कालच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे दोन स्वदेशी युद्धनौका लॉन्च केल्या. यामुळे भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढण्यास मदत होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही युद्ध नौका मेक इन इंडिया (Make In India) अंतर्गत भारतात निर्मिती केलेल्या आहेत. दोन स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका एकाच वेळी लॉन्च करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे MDL ने म्हटले आहे.

लॉन्च केलेल्या या दोन्ही युद्धनौकांना पर्वत आणि शहराची नावे देण्यात आली आहेत. दोन्ही युद्धनौकांची रचना नौदल रचना संचालनालया (DND) अंतर्गत करण्यात आली असून, याची संपूर्ण निर्मिती MDL, मुंबई येथे करण्यात आली आहे. सुरत ही नौका 15B वर्गाची असून क्षेपणास्त्र विनाशक आहे, तर उदयगिरी ही P17A वर्गाची दुसरी स्टेल्थ युद्धनौका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT