navi delhi  
देश

नवी दिल्ली : गोदामाची भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू, अलीपूरमधली घटना

अलीपूर भागात भिंत कोसळल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

अलीपूर भागात भिंत कोसळल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील अलीपूर येथील एका भागात गोदामाची भिंत कोसळली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेत भिंतीखाली दबून ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार गोदामामध्ये २० ते २५ कामगार करत होते.

दरम्यान, अलीपूर भागात भिंत कोसळल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झालं असून तातडीनं बचावकार्य सुरु केलं आहे. आतापर्यंत या दुर्घटनेतील १० जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती आहे. या घटनेतील जखमी कामगारांना उपचारासाठी दिल्लीतील हरीशचंद्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. परंतु अजून काहीजण या भिंतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तक्रार मिळूनही प्रशासनानं अवैध गोदामाचं बांधकाम रोखण्याचा प्रयत्न केला नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

भिंतीखाली आणखी १० जण अडकले असल्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १० जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर, ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. जखमींपैकी २ जण गंभीर जखमी आहेत. कामगारांना वाचवण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT