Navjot Singh Sidhu
esakal
Navjot Sidhu Politics Update : पंजाबचे माजीमंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजकारणात पुनरागमनाच्या चर्चा तीव्र झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी त्यांना नवीन मतदारसंघ शोधण्याचा सल्ला दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत नवजोत कौर सिद्धू म्हणाल्या की, ज्या कामामुळे माणसाचे ओळख असेल तेच केले पाहीजे.
तसेच नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजकारणातील पुनरागमनाबाबत त्यांच्या पत्नी नवजोत कौर म्हणल्या की, जर त्यांना वाटत असेल की ते काम करू शकतात आणि लोकांचे कल्याण करू शकतात तर ते परत येतील. हो, त्यांना आता दुसरी जागा शोधावी लागेल.
सिद्धू यांच्या राजकारणात पुनरागमनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांच्या पत्नीने उत्तर तर दिलंच. शिवाय, त्यांनी स्वत: बद्दलही सांगितले की त्या राजकारणात सक्रीय राहतील. तसेच, सिद्धू यांना राजकारणात काम करण्याची संधी मिळाली नाही, म्हणून ते दूर झाले होते, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय "जर कोणी हे सिद्ध केले की मी काम करण्यास असमर्थ आहे, तर मी राजकारण सोडेन." अशी मोठी घोषणाही नवजोत कौर सिद्धू यांनी यावेळी केली. एवढच नाहीतर, त्यांनी हे देखील स्पष्ट केले की त्यांची निवडणूक लढवण्यासाठीची जागा निश्चित आहे. तसेच त्यांनी सांगितले की जेव्हा सिद्धू निवडणूक लढवतील तेव्हा त्यांनी स्वतःची जागा शोधावी. असे म्हणत त्या हसल्या आणि त्यांचे निवडणुकीबाबतचे हेतू स्पष्ट केले.