navjyot singh siddhu road rage case
navjyot singh siddhu road rage case e sakal
देश

कारावासाच्या शिक्षेनंतर सिद्धूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court on Navjot Singh Sidhu) मोठा झटका बसला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर सिद्धू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मी कायद्याचं पालन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सिद्धू यांचे 1988 मध्ये पटियाला येथे पार्किंगवरून भांडण झाले होते. यामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना एक हजाराचा दंड ठोठावून सुटका केली होती. त्याविरोधात पीडित व्यक्तीच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.

नेमकं काय आहे प्रकरण? -

27 डिसेंबर 1988 रोजी नवज्योत सिद्धू आणि त्यांचे मित्र रुपिंदर सिंह संधू यांचा पटियाला येथे कार पार्किंगवरून गुरनाम सिंग नावाच्या एका वृद्ध व्यक्तीसोबत वाद झाला होता. या लढाईत गुरनामचा मृत्यू झाला. सिद्धू आणि त्यांचा मित्र रुपिंदरसिंग संधू यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंजाब सरकार आणि पीडितेच्या कुटुंबाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. 1999 मध्ये सत्र न्यायालयाकडून सिद्धू यांना दिलासा मिळाला आणि खटला फेटाळण्यात आला. न्यायालयाने म्हटले होते की आरोपींविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नाहीत आणि अशा प्रकरणात केवळ संशयाच्या आधारे खटला सुरू करता येणार नाही. परंतु 2002 मध्ये राज्य सरकारने सिद्धूंविरुद्ध पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका केले.

1 डिसेंबर 2006 रोजी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सिद्धू आणि त्यांच्या मित्राला दोषी ठरवले. 6 डिसेंबर रोजी सुनावण्यात आलेल्या निकालात सिद्धू आणि संधू यांना तीन वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. 10 जानेवारी 2007 पर्यंत सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. दोन्ही आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर 11 जानेवारी रोजी चंदीगड न्यायालयात आत्मसमर्पण केले. 12 जानेवारीला सिद्धू आणि त्यांच्या मित्राला सुप्रीम कोर्टातून जामीन मिळाला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. यानंतर तक्रारदाराने सुप्रीम कोर्टात जाऊन सिद्धू यांना हत्येप्रकरणी दोषी ठरवण्याची मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT