Naxalites
Naxalites Naxalites
देश

नक्षलवादी आले अन् इसमाला घेऊन गेले; सकाळी गावाबाहेर आढळला मृतदेह

सकाळ डिजिटल टीम

छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा (Naxalites) अमानुष चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. भूमकल दिनाच्या दिवशी माओवाद्यांनी टाटुम गावात गावकऱ्याची हत्या केली. सशस्त्र नक्षलवादी रात्री गावात आले आणि गावकऱ्याला घेऊन गेले. सकाळी गावापासून काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळून (murder a Man) आला. नक्षलवादी घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण आहे. ही घटना काटेकल्याण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मंगलु मरकाम (४७) असे मृताचे नाव आहे.

बुधवारी रात्री मंगलू कुटुंबासह घरीच होता. रात्री १० सशस्त्र माओवाद्यांनी (Naxalites) मंगलूच्या घराला वेढा घातला. त्याला घराबाहेर ओढून बाहेर काढले. नक्षलवादी मंगलूला बेदम मारहाण करीत राहिले आणि कुटुंबीय त्याला सोडून देण्याची विनंती करीत होते. यानंतर माओवाद्यांनी मंगलू मरकमला सोबत नेले. सकाळी त्याचा मृतदेह गावाबाहेर पडलेला आढळून (murder a Man) आला, असे दंतेवाडाचे एसपी सिद्धार्थ तिवारी यांनी सांगितले.

मंगलूला गावाबाहेर आणून दोरीने गळा आवळून हत्या केली. एकीकडे देश भूमकाल दिवस साजरा करीत असताना दुसरीकडे माओवाद्यांनी (Naxalites) निष्पाप गावकऱ्याची हत्या केली. मृताचा पोलिसांशी कोणताही संबंध नसून तो त्याच्या गावात शेतीची कामे करत असे. याप्रकरणी काटेकल्याण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे, असे एसपी सिद्धार्थ तिवारी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT