sharad pawar.jpg
sharad pawar.jpg 
देश

तुम्हाला बोलवूनच चूक केली, शरद पवार पत्रकारांवर भडकले

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि.8) पुरंदर विमानतळाच्या अधिग्रहणासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी सातत्याने नव्या कृषी कायद्याविषयक आणि शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्न आता विचारु नका उद्या यावर भूमिका मांडू असे शरद पवार सुरुवातीपासून सांगत होते. तरी प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींनी वारंवार तेच प्रश्न विचारले. त्यामुळे पत्रकार परिषद संपताना शरद पवार यांनी मी तुम्हाला बोलवूनच चूक केली, अशा शब्दांत संताप व्यक्त केला. 

आपली भेट ही कृषी कायदा किंवा शेतकरी आंदोलनाबाबत नव्हे तर पुणे आणि पुरंदर विमानतळासंदर्भात होती. त्यामुळे नव्या कृषी कायद्याविषयक प्रश्न मला विचारु नका. बुधवारी याबाबत काही पक्षांची बैठक होईल. त्यात सर्वांशी चर्चा करुन एकत्रित भूमिका उद्या मांडू असे त्यांनी म्हटले. तरीही पत्रकार हे पवार यांनी कृषी कायद्याबद्दल 2010 मध्ये लिहिलेल्या पत्राबाबत प्रश्न विचारले त्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी माझे पत्र नीट वाचलेले नाही, असा टोलाही भाजपला लगावला. 

त्यानंतर ते पुन्हा पुण्यातील विमानतळाबाबत माहिती देत होते. पत्रकारांनी त्यावेळी त्यांना पुन्हा कृषी कायद्याबाबत प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी पुन्हा बुधवारी याबाबत बोलणार असल्याचे स्पष्ट केले आणि आता आपण थांबूयात म्हणून उठून जायला निघाले. त्यावेळी त्यांनी जाताना मी तुम्हाला बोलवूनच चूक केली, असे म्हटले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : दोघांची नजर प्लेऑफच्या तिकीटावर... पण चेन्नई घेणार पंजाबकडून मागील पराभवाचा बदला

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT