NCP jitendra awhad on rahul gandhi t shirt in the cold congress bharat jodo yatra  
देश

Congress News: "2500 किमी चालूनही…"; दिल्लीच्या थंडीत T-Shirtवरील राहुल गांधींचा फोटो NCP नेत्याने केला शेअर

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi T-shirt : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहचली आहे. नवीन वर्षानंतर हा प्रवास पुन्हा येथून सुरू होईल. दरम्यान, 26 डिसेंबर रोजी राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या समाधीवर जाऊन श्रद्धांजली वाहिली. यादरम्यान, दिल्लीच्या गोठवणाऱ्या थंडीतही राहुल गांधी एकाच टी-शर्टमध्ये दिसले. याबाबत सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.(Congress News)

अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता की, अखेर राहुल गांधींना थंडी वाजत नाही का? इतकेच नाही तर या दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्रे आव्हाड यांनी देखील राहुल गांधी यांचा फोटो शेअर करत त्यांचं कौतुक केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी लिहीलं की, "2500 किलोमीटर चालून आला आहे .. तेज तेच .. थकवा दिसतो आहे कुठे ...किती हिणवलं ..टोमणे मारले ...दिल्लीच्या थंडीत टी शर्टवर फिरतो आहे... नावात गांधी आहे." यासोबत त्यांनी राहुल गांधी यांचा पांढऱ्या रंगाच्या टीशर्टमधील फोटो देखील ट्विट केला आहे.

हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

दिल्लीतील कडाक्याच्या थंडीमध्ये देखील राहुल गांधी हे फक्त टी शर्ट घालून फिरताना दिसत आहेत. याबद्दल त्यांना प्रश्न देखील विचारण्यात आला होता. लाल किल्ल्यावरून यात्रेकरू आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते की लोक मला विचारतात की मी फक्त टी-शर्टमध्ये का चालतो, मला वाटले की ते मला विचारत आहेत, पण तुम्ही भारतातील शेतकऱ्याला का विचारत नाही? हे भारतातील मजूर गरीब मुलांना का विचारत नाहीत?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal No 1 : नव्या वर्षात डिजिटल पत्रकारितेचा नेतृत्वाचा मुकुट पुन्हा ई-सकाळकडे, कॉमस्कोअरमध्ये पटकावले अव्वल स्थान

Retirement Plan : आता रिटायरमेंटनंतर पैशांची चिंता नाही! या 5 योजनांत गुंतवणूक करा; तिजोरी भरलेलीच राहील, दरमहा मिळेल मोठी पेन्शन

Tilak Varma Injury: तिलक वर्माला पोटातील तीव्र वेदनेमुळे अचानक करावी लागली सर्जरी! त्याला झालेला अजार नेमका आहे तरी काय?

Mangal Gochar 2026: 18 वर्षांनंतर कुंभ राशीत मंगल गोचर! अग्नि-वायु एकत्र येऊन तयार होतोय अंगारक योग, वृषभसह 'या' 5 राशींच आयुष्य होईल अगदी कठीण!

Latest Maharashtra News Updates Live: आष्टापुरात बिबट्याने तीन बकऱ्यांचा घेतला जीव

SCROLL FOR NEXT