DP Tripathi
DP Tripathi 
देश

राष्ट्रवादीचे माजी खासदार डीपी त्रिपाठी यांचे निधन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार डी. पी. त्रिपाठी यांचे आज (गुरुवार) दीर्घ आजारपणाने निधन झाले. 

दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारपणाशी झुंज देत होते. त्रिपाठी हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महासचिव पदाची जबाबदारी सांभाळत होते. गेल्यावर्षीच त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपला होता. आणीबाणीच्या काळात ते कारागृहात राहिले होते. 1968 मध्ये राजकारणात प्रवेश केलेल्या त्रिपाठी यांची एक उत्तम वक्ते म्हणून ओळख होती.

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. पटेल म्हणाले, की डीपी त्रिपाठी यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. त्यांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 

त्रिपाठींचे अखेरचे भाषण चर्चेत
त्रिपाठी यांनी राज्यसभेचा कार्यकाळ संपताना केलेले भाषण सर्वांच्या लक्षात आहे. त्यांनी सेक्स या विषयावर संसदेत चर्चा होणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. सेक्ससंबंधी आजारातून अनेक जणांना आपला जीव गमवावा लागतो, पण यावर कधीच चर्चा होत नाही. कामसूत्र सारखे पुस्तक लिहिलेल्या देशात सेक्स विषयावर चर्चाही होत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT