ncp leader sharad pawar anil deshmukh resignation 
देश

अनिल देशमुखांना अभय; शरद पवारांनी सगळे आरोप फेटाळले

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिल्याच्या आरोपामुळं गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागणार की, त्यांना क्लीन चीट मिळणार, याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली होती. आज, संसदेतही हा मुद्दा चर्चेत आल्यानं संपूर्ण देशाचं लक्ष याकडं लागलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन, या संदर्भात आपलं मत व्यक्त केलं होतं. त्याच वेळी त्यांनी अनिल देशमुख यांच्याशी आणि इतर मित्र पक्षांशी तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले होते. आज, शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आपली मांडली. त्यात पवार यांनी पोलिस अधिकारी परम बीर सिंग यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ज्या काळात देशमुख यांनी वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला जात आहे. त्याकाळात देशमुख कोरोनाचे उपचार घेत होते, असा मुद्दा पवार यांनी उपस्थित करून, परम बीर सिंग यांच्या आरोपांमधील हवाच काढून घेतली.

काय म्हणाले शरद पवार?
काल (रविवार, 21 मार्च) झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर चर्चेतून निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. नवी दिल्लीत, काल शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे नेते उपस्थित होते. त्यानंतरही जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पत्रकारांना स्पष्ट केले होते. तरीही आघाडीतील इतर नेत्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली होती. त्यानंतर आज, पुन्हा पत्रकार परिषद घेत पवार यांनी अनिल देशमुख राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. पोलिस अधिकारी परम बीर सिंग यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं पवार यांनी म्हटलंय. ज्या काळात देशमुखांनी वसुलीचे आदेश दिल्याचे संदर्भ पत्रात आहेत. त्या काळात अनिल देशमुख उपचार घेत होते, असं पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यामुळं आरोप खोटे आहेत, असं सांगून पवार यांनी देशमुखांच्या राजीनामा घेणार नसल्याची भूमिका कायम ठेवली.


(आणखी सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! एकनाथ शिंदेंचे कौतुक, उद्धव ठाकरे गटाला धक्का; कारण सांगत ओमराजेंनी स्पष्ट केली भूमिका

विद्यार्थ्यांना त्रास नको म्हणून मोदींची संवेदनशीलता; NEET सुरू होईपर्यंत 45 मिनिटे विमानतळावर केली प्रतीक्षा

Maharashtra Monsoon: मान्सून ज्याच्यामुळे रखडला ते सोमाली जेट आहे काय?

Groundwater Protection: पुणे जिल्ह्यात धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण व बेकायदेशीर बोअरवेलवर नियंत्रणाची मागणी; भूजल संवर्धनासाठी ठोस उपाययोजनांचा आग्रह

माढा कसबा पेठेतील ऐतिहासिक विठ्ठल Madha Vitthal Temple restoration: मंदिराला प्राचीन रूप परतवण्यासाठी सॅंड ब्लास्टिंगद्वारे रंग काढण्याचे काम; भाविकांसाठी दर्शन तात्पुरते बंद

SCROLL FOR NEXT