Sharad pawar sakal
देश

Karnataka Election : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस जिंकणार की हरणार? शरद पवारांचं मोठं भाकीत

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास एक महिना बाकी आहे.

Balkrishna Madhale

केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये भाजपचं सरकार नाही. कर्नाटकात निवडणूक असून काँग्रेस जिंकेल असा माझा विश्वास आहे.

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास एक महिना बाकी आहे. अशा स्थितीत निवडणुकीबाबत उत्साहही वाढला आहे.

यंदा काँग्रेसचं (Congress) पुनरागमन होत असल्याचं निवडणुकीपूर्वी समोर आलेल्या सर्वेक्षणात दिसून आलं. आता याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाचं भाकीत केलंय.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी काँग्रेसला ही निवडणूक जिंकण्याची चांगली संधी असल्याचं म्हटलंय. सध्या कर्नाटकात भाजपची सत्ता असून, यावेळीही विजय निश्चित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राज्यात होत असलेल्या या निवडणुकीकडं पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ शकत नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले पवार?

ते म्हणाले, 'केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये भाजपचं सरकार नाही. कर्नाटकात निवडणूक असून काँग्रेस जिंकेल असा माझा विश्वास आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार होतं आणि कमलनाथ मुख्यमंत्री होते. मात्र, आमदार फुटले आणि नंतर भाजपचं सरकार सत्तेत आलं. राजस्थान, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल आणि इतर अनेक राज्ये आहेत, तिथंही भाजपचं सरकार नाही.'

..तर खूप कठीण जाणार

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत शरद पवार म्हणाले, विरोधकांना एकत्र करावं लागेल, अन्यथा भाजपला पराभूत करणं फार कठीण होऊन बसेल. जर आपण एकत्र आलो नाही तर खूप कठीण जाणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Avimukteshwaranand : स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मोठा दिलासा; अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटक स्थगित केली

Rashmika wedding: ना पुरोहित , ना अग्नि; तरीही पवित्र! जाणून घ्या रश्मिका–विजयच्या कोडावा पद्धतीतील विवाहसोहळ्यामागील अनोख्या परंपरा

Silver Buying Tips : ऑनलाइन सिल्वर ज्वेलरी खरेदी करताय? मग बनावट चांदीपासून राहा सावध, आत्ताच पाहा फेक ओळखायच्या 'या' 5 ट्रिक्स

Akola News : स्मार्ट मीटरचा पातूर पोलीस स्टेशनला दणका; चार महिन्यांचे ५२ हजार रुपये बिल थकीत, वीजपुरवठा खंडित

Crime: भयंकर! क्षुल्लक वाद विकोपाला गेला; २१ वर्षीय तरूणाने १२ वर्षीय भावाला संपवलं, अमरावतीत धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT