NCP Sharad Pawar First reaction on inauguration of the new Parliament with havan multi-faith prayers  
देश

Sharad Pawar : "मी गेलो नाही याचं समाधान वाटतंय…"; पवारांची संसद उद्घाटन सोहळ्यावर जोरदार टीका

रोहित कणसे

नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज, २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे. आज संसदेत पार पडलेले कार्यक्रम पाहून मी तेथे गेलो नाही याचं आणखी समाधान वाटतंय अशा शब्दात पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad Pawar First reaction on inauguration of the new Parliament)

पवारांनी या कार्यक्रमावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार म्हणाले की, सकाळी मी हा कार्यक्रम पाहिला. तो पाहिल्याच्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो नाही याचं आणखी मला समाधान वाटतंय. त्याचं कारण ज्या लोकांची तिथं उपस्थिती होती आणि जे काही कर्मकांड सुरू होतं ते पाहिल्यानंतर अधुनिक भारताची संकल्पना - जी जवाहारलाल नेहरूंनी मांडली, ती आणि सध्या संसदेत जे सुरू आहे त्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, असे पवार म्हणाले आहेत.

पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्ष पाठीमागे घेऊन जातोय की काय अशी चिंता वाटत आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. नेहरूंनी अधुनिक विज्ञानावर आधारित समाज तयार करण्याची भूमिका सतत्याने मांडली. आज जे संसदेत चाललंय ते याच्या नेमकं उलट सुरू आहे असे शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, संसदेच्या कुठल्याही कामाची सुरूवात राष्ट्रपतींच्या उपस्थिती किंवा त्यांच्या भाषणातून होत असते. उद्या आधिवेशन सुरू झालं तर त्याची सुरूवात राष्ट्रपतींच्या भाषणाने होते. राज्यसभेचा मी सभासद आहे. राज्यसभेचे प्रमुख हे उपराष्ट्रपती आहेत. या कार्यक्रमात लोकसभेचे स्पीकर दिसले आनंद आहे, पण राज्यसभेचे स्पीकर जे उपराष्ट्रपती आहेत त्यांची उपस्थिती कार्यक्रमात दिसली नाही. त्यामुळे हा सगळा कार्यक्रम फक्त मर्यादित घटकांपुरताच होता का अशी शंका वाटते असे शरद पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashes: जो रूटचं ऑस्ट्रेलियात पहिलंच शतक! ४० व्या सेंच्युरीनंतर खास सेलिब्रेशनही केलं; पण स्टार्कनेही ६ विकेट्ससह मैदान गाजवलं

Sakal Survey: मराठी संवर्धनासाठी महायुती सरकारचे प्रयत्न कितपत यशस्वी? ‘सकाळ’च्या सर्वेक्षणात उलगडलं चित्र

Latest Marathi News Live Update : "मोहोपे" स्टेशनचे नाव "पोयंजे" रेल्वे स्टेशन असे करण्यात येईल

Silent Diseases Alert: 'हे' ५ शांतीत क्रांती करणारे आजार कधीच दाखवत नाहीत लक्षणं; डॉक्टर देतात वेळीच सावध होण्याचा इशारा

Sakal Survey 2025: महायुती सरकारची वर्षपूर्ती! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची कामगिरी कशी होती?

SCROLL FOR NEXT