Sharad Pawar and Sonia Gandhi Twitter
देश

विरोधकांचा 'हम साथ साथ है..' शो; शरद पवारांची भूमिका लक्षवेधी

सोनिया गांधींच्या निर्णयाचे शरद पवारांकडून तोंडभरुन कौतुक

सुशांत जाधव

देशातील समविचारी पक्षांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधात मोटबांधणीला सुरुवात केलीये. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सर्व पक्षीय नेत्यांशी संवाद साधला. सोनिया गांधी यांनी बोलवलेल्या बैठकीला विरोधी पक्षातील नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने भाजपविरोधात पुन्हा एकदा समविचारी पक्ष एकत्र लढण्यासाठी सक्रीय होत असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देखील या बैठकीला उपस्थितीत होते. देशातील सध्याच्या परिस्थिती पाहता सर्वांनी एकत्रित येणं आवश्यक होतं. त्या दृष्टीने सोनिया गांधी यांनी बोलवलेली बैठक खूप महत्त्वपूर्ण आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

सोनिया गांधी यांनी बोलवलेल्या बैठकीचे स्वागत करत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे "हम साथ साथ है.."चा नाराच दिलाय. शेतकरी आंदोलन, महागाई, आर्थिक मंदी, बेरोजगारी, सीमा वाद, अल्पसंख्याक समुदायाचा मुद्दा असे अनेक प्रश्न सध्याच्या सरकारच्या काळात निर्माण झाले आहेत. यातून बाहेर पडायचे असेल तर लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे, असा मोलाचा सल्लाही शरद पवारांनी दिलाय.

या बैठकीसंदर्भात शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे तिसऱ्या आघाडीतून काँग्रेसचा पत्ता कट झाल्याच्या चर्चाही फोल ठरल्याचे चित्र समोर आले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला शह देणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी भाजप विरोधात मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या.

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेसाठी भाजपविरोधात मोर्चेबांधणीत काँग्रेसला दूर ठेवण्यात येत असल्याच्या चर्चाही रंगताना दिसले. पण सोनिया गांधी यांनी घेतलेली बैठक, त्याला विरोधी पक्षातून मिळालेला प्रतिसाद आणि शरद पवारांनी घेतलेली भूमिका यामुळे भाजप विरोधात विरोधी पक्षांचा आजही 'हम साथ साथ है...' नारा कायम असल्याचे चित्र समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT