ncrb 2021 report maharashtra reports highest number of suicides in india followed by tamil nadu  
देश

आत्महत्यांबाबत महाराष्ट्र देशात अव्वल, तामिळनाडु दूसऱ्या क्रमांकावर

सकाळ डिजिटल टीम

भारतात दरवर्षी आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. एनसीआरबी (National Crime Records Bureau)च्या ताज्या अहवालमध्ये देखील हीत माहिती समोर आली आहे. 2021 मध्ये भारतात एकूण 1,64,033 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. 2020 मध्ये ही संख्या 1,53,052 होती. या अहवालानुसार 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये आत्महत्यांच्या घटनांमध्ये 7.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी आत्महत्यांचे प्रमाण यंदा 6.2 टक्क्यांनी वाढले आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या ताज्या अहवालानुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यापाठोपाठ तामिळनाडू आणि मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. या अहवालानुसार 2021 मध्ये देशभरात 1,64,033 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. ज्यामध्ये 22,207 लोक हे महाराष्ट्रातील आहते तर 18,925 नागरिक हे तामिळनाडूचे होते.

या अहवालात माहिती देण्यात आली आहे की, 2021 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 22,207 आत्महत्या झाल्या आहेत. त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 18,925 आत्महत्या, मध्य प्रदेश 14,965, पश्चिम बंगाल 13,500 आणि कर्नाटकात 13,056 आत्महत्या झाल्या आहेत. ही आकडेवारी एकूण आत्महत्यांच्या अनुक्रमे 13.5 टक्के, 11.5 टक्के, 9.1 टक्के, 8.2 टक्के आणि 8 टक्के इतकी आहे.

एकट्या पाच राज्यांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक आत्महत्या

महत्वाचे म्हणजे एनसीआरबीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, देशभरातील एकूण आत्महत्यांपैकी 50.4 टक्के आत्महत्या या पाच राज्यांमध्ये होतात. उर्वरित 49.6 टक्के प्रकरणे इतर 23 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदवली गेली आहेत. त्याच वेळी, देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये आत्महत्यांच्या घटनांची संख्या तुलनेने कमी नोंदवली गेली आहे. यूपीमध्ये, ही टक्केवारी देशातील आत्महत्या प्रकरणांपैकी केवळ 3.6 टक्के आहे. विशेष म्हणजे, यूपीची लोकसंख्या देशाच्या लोकसंख्येच्या 16.9 टक्के आहे.

केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्ली अव्वल

दरम्यान, 2021 मध्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्लीत सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. येथे 2840 आत्महत्येची प्रकरणे नोंदवली गेली, त्यानंतर पुद्दुचेरीमध्ये 504 प्रकरणे नोंदवली गेली. एनसीआरबीने आपल्या अहवालात असेही म्हटले आहे की 2021 मध्ये देशातील 53 मोठ्या शहरांमध्ये एकूण 25,891 आत्महत्या झाल्या आहेत.

2021 मध्ये अखिल भारतीय आत्महत्येचे दर 12 टक्के होता. अंदमान आणि निकोबार बेटांवर सर्वाधिक आत्महत्या (39.7) झाल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ सिक्कीम (39.2), पुडुचेरी (31.8), तेलंगणा (26.9) आणि केरळ (26.9) यांचा क्रमांक लागतो.

कारणे काय आहेत?

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अहवालानुसार आत्महत्येमागील कारणे ही , व्यावसायिक किंवा करिअरशी संबंधित समस्या, परकेपणाची भावना, गैरवर्तन, हिंसा, कौटुंबिक समस्या, मानसिक विकार, दारूचे व्यसन, आर्थिक नुकसान आणि तीव्र वेदना ही मुख्य कारणे आहेत.

2021 मध्ये रस्ते अपघातात 1.73 लाख लोकांचा मृत्यू

2021 मध्ये देशात सुमारे 4.22 लाख वाहतूक अपघात झाले. या दरम्यान 1.73 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 24,711 मृत्यू झाले, त्यानंतर तामिळनाडूमध्ये 16,685 आणि महाराष्ट्रात 16,446 मृत्यू झाले. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अहवालानुसार, 2020 मध्ये देशातील वाहतूक संबंधित अपघातांची संख्या 3,68,828 होती, 2021 मध्ये ही संख्या 4,22,659 पर्यंत वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजने बॉल फेकून मारलाच होता, जो रूटवर खवळला; नेमकं काय घडलं?

Radhika Yadav: 'तो' वाद अन्...; टेनिस खेळाडू राधिका यादवला वडिलांनी का संपवलं? पोलिसांनी खरं कारण सांगितलं!

Navi Mumbai News: पनवेलचा पाणी प्रश्न सुटण्यास २०२६ उजाडणार, न्हावा-शेवा टप्पा-३ प्रकल्‍पास विलंब!

IND vs ENG 3rd Test: कंटाळवाण्या कसोटीत तुमचं स्वागत! शुभमन गिल अन् मोहम्मद सिराज ऑन फायर, स्लेजिंगचा मजेशीर Video Viral

Kapil Sharma Canada Cafe Shooting Video : कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर झालेल्या भयानक गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर!

SCROLL FOR NEXT