Nitish Kumar esakal
देश

Nitish Kumar : ''नितीश कुमारांसाठी NDA ची दारं बंद'', केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘इंडिया’ आघाडीमध्ये नितीश कुमार यांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने ते इंडिया आघाडी सोडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) पुन्हा सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाटणाः ‘इंडिया’ आघाडीमध्ये नितीश कुमार यांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने ते इंडिया आघाडी सोडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) पुन्हा सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, ‘‘नितीश यांच्यासाठी ‘एनडीए’ची दारे कायमची बंद झाली आहेत’’ असा दावा केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह यांनी गुरुवारी केला.

गिरिराजसिंह म्हणाले, ‘‘बिहारमधील महाआघाडीच्या सरकारमधील प्रमुख पक्ष असलेला संयुक्त जनता दलाला (जेडीएस) असलेला लोकांचा पाठिंबा आता कमी होत आहे, नितीश यांना लोकांचा असलेला पाठिंबाही कमी होत आहे.’’

नितीश यांनी काही दिवसांपूर्वी लोकसंख्या नियंत्रणाबाबत बोलत असताना महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते ,असा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्याचा संदर्भ देत गिरिराजसिंह म्हणाले की, महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्या करणाऱ्या त्यांच्यासारख्या नेत्याने, खरे तर राजीनामा द्यायला हवा.

बिहारला लवकरच नवा मुख्यमंत्री
‘‘नितीश कुमार यांचे मुख्यमंत्रिपदाचे फार थोडे दिवस राहिले असून लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्यासाठी चक्रव्यूह रचले आहे. या दृष्टीने उचलण्यात आलेले पहिले पाऊल म्हणजे बिहारच्या विधानसभाध्यक्षपदी अवध बिहारी चौधरी यांची नियुक्ती. बिहारला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळेल,’’ असे सिंह म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT