Nearly 70 Dead in Horrific Outbreak at Holyoke Soldiers Home 
देश

Coronavirus : अमेरिका हादरलं ! वृद्धाश्रमात मृतांचा खच

वृत्तसंस्था

मॅसेच्युसेट्स : कोरोनाने अमेरिकेत अक्षरशः थैमान घातलं आहे. मॅसेच्युसेट्स येथील वृद्धाश्रमामध्ये तब्बल ७० वृद्धांचा मृत्यू झाला आहे. मॅसेच्युसेट्स येथील होलीओके सोल्जियर्स होम येथे मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळं येथील रहिवाश्यांना योग्य आरोग्य सेवा मिळत नसल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

होलीओके सोल्जियर्स येथील वृद्धांच्या नातेवाईकांनी या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली. गेल्या दोन दिवसांत येथील ३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोना झालेल्या रुग्णाचे वय हे ६६ आणि त्यापुढील होते. दरम्यान, होलीओके सोल्जियर्स होमच्या अधीक्षक प्रशासकिय रजेवर होत्या. त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर योग्यवेळी सेवा न पुवरल्याप्रकरणी आरोप केले आहेत.

Coronavirus : 'या' तारखेपासून भारतात होणार रोज एक लाख टेस्ट; आरोग्यमंत्र्यांची माहिती

होलीओके सोल्जियर्स होमच्या अधीक्षक बेनेट वॉल्श म्हणाले की, या महिन्याच्या सुरूवातीला राज्य अधिकाऱ्यांना माहित आहे की येथे कर्मचार्‍यांची कमतरता आहे. तरीही आरोग्य सुविधा योग्य वेळी मिळाल्या नाहीत. परिणामी येथील वृद्धांना आपला जीव गमवावा लागत आहे. दरम्यान, येथील कर्मचारी एकाच वेळी अनेकांना मदत करण्यासाठी सतत दुसर्‍या युनिटमध्ये जात असत आणि त्यामुळं कोरोनाचा प्रसार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

संतांच्या हत्यावरून ट्विटरवॉर; योगींचे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर

दरम्यान, अमेरिकेत दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सध्या १० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत ५८ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्यात सर्वात भयंकर परिस्थिती वृद्धांची आहे. सध्या राज्य आणि फेडरल अधिकारी आरोग्य सुविधेत काय चूक झाली ज्यामुळं हा उद्रेक झाला, याचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन वर्षातून १ चित्रपट तरीही कोट्यवधींचा मालक आहे सलमान खान; कुठून होते अभिनेत्याची कमाई, वाचा साइड बिझनेसचं गणित

Railway Rest House: बेड, फ्रिज, आरओ अन्... भारतीय रेल्वेची मोठी भेट; आधुनिक विश्रामगृह सुरू

Kothrud News : कोथरूडमध्ये एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप!

'धुरंधर'च्या यशामध्ये खऱ्या रहमान डकैतच्या मयतीचा व्हिडिओ व्हायरल; एन्काउंटरनंतर अशी होती परिस्थिती, मृतदेहाजवळ...

Latest Marathi News Live Update : ३०० लोक रद्द, पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेसाठी शनिवारी कामे

SCROLL FOR NEXT