Neem Karoli Baba esakal
देश

Neem Karoli Baba : विराट कोहलीच्या भेटीनंतर नीम करोली बाबांच्या कैंची धाममध्ये भाविकांच्या रांगा

नीम करोली बाबांना भाविक हनुमंताचा अवतार मानतात.

धनश्री भावसार-बगाडे

Hanuman Jayanti 2023 Neem Karoli Baba : उत्तराखंडमधल्या नैनिताल जिल्ह्यातील कैंची धाम हे नीम करोली बाबांच स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या धामची स्थापना नीम करोली बाबांनी १५ जून १९६४ मध्ये याची स्थापना केली होती. नीम करोली बाबांना भाविक हनुमंताचा अवतार मानतात. त्यांनी हनुमंताची आराधाना करून अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या.

काही काळापूर्वी इथे फक्त मोजता येण्याएवढीच लोकं येत होती. पण काही महिन्यांपूर्वी जेव्हा विराट कोहली तिथे दर्शन घेऊन गेला, त्यानंतर या आश्रमात हजारोंनी भक्तांच्या रांगा लागू लगल्या आहेत.

देशातूनच नाही तर परदेशातूनही भाविक नीम करोली बाबांचं दर्शन, आशीर्वाद घ्यायला येत आहेत. विराट आपली पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत भवाली येथील कैंची धाममध्ये दर्शनाला गेले होते. याविषयीची चर्चा सोशल मीडियावर झाली. मग या मंदिराविषयी अनेक लोकांनी सर्च करून माहिती घेतली. त्यामुळे नीम करोली बाबांविषयी लोकांमध्ये आस्था वाढत असल्याचे दिसून आले. साधारण रोज १० ते १५ हजार भाविक इथे दर्शनासाठी येतात.

हनुमंताचा अवतार होते नीम करोली बाबा

नीम करोली बाबा हनुमंताचे उपासक होते. त्यांनी उपासनेतून अनेक सिद्धी प्राप्त केल्या आहेत. बाबांना बडेजाव करायला आवडत नसे. त्यांना सामान्य व्यक्तीप्रमाणेच रहायला आवडत होते. त्यामुळे ते भाविकांना आपल्या पडू देत नसतं. नीम करोली महाराज यांचे देशात आणि जगात मिळून एकूण १०८ आश्रम आहेत. यातील सर्वात मोठा आश्रम नैनितालमधला कैंची धाम आणि अमेरिकेतील मॅक्सिको सिटीमधला टाऊस आश्रम आहे.

बाबांच्या भक्तांमध्ये प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश

बाबांच्या भक्तांमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि अॅप्पलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचा समावेश आहे. या दोघांच्या आयुष्यात इतर सामान्य लोकांप्रमाणे समस्या होत्या तेव्हा ते या आश्रमात बाबांच्या दर्शनासाठी आले होते.

प्रसिद्ध लेखक रिचर्ड अल्परटने पण आपलं पुस्तक मिरॅकल ऑफ लव यात नीम करोली बाबांचा उल्लेख केला आहे. ज्यात बाबांनी केलेल्या चमत्कारांविषयी सांगण्यात आलं आहे. असं मानलं जातं की, या कैंची धाममध्ये बाबांचे चमत्कार आजही होतात.

याशिवाय हॉलिवूड अभिनेत्री जूलिया रॉबर्ट्स सह इतर अनेक दिग्गज या आश्रमात येऊन बाबांचा आशीर्वाद घेऊन गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Junnar News: 'ड्रंक अँड ड्राईव्ह आरोपींना आर्थिक दंडाबरोबर दोन वृक्ष लावण्याचा आदेश'; लोकन्यायालयातील पर्यावरणपूरक निर्णयाचे होतेय कौतुक

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT