Neem Karoli Baba esakal
देश

Neem Karoli Baba : नीम करोली बाबांचा हा चमत्कार तुम्हाला माहितीये? त्यांना रेल्वे कोचमधून उतरवलं अन्...

नीम करोली बाबांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कार केल्याचं त्यांचे भक्त सांगतात.

धनश्री भावसार-बगाडे

Neem Karoli Baba Miracles Train Story : भारतातल्या महान संतांपैकी एक म्हणून जग नीम करोली बाबांना ओळखतात. त्यांचे भक्तही जगभर आहेत. त्यांच्या आशीर्वादाने अनेकांचं आयुष्य सुधारलं. लोकांना नवी दिशा मिळाली. यात अनेक मान्यवर लोकही आहेत. जसे, फेसबुकचे फाउंडर मार्क झुकरबर्ग, अॅप्पलचे को फाउंडर स्टीव्ह जॉब्ज, क्रिकेटर विराट कोहली इत्यादी.

त्यांच्या विचारांप्रमाणेच त्यांचे चमत्कारही फार प्रसिद्ध आहेत. असाच एक प्रसंग रेल्वेशी निगडीत आहे. ज्यामुळे रेल्वे स्टाफला त्यांची चुक मान्य करून महाराजांची माफी मागावी लागली.

मिरॅकल ऑफ लव्ह मध्ये उल्लेख

नीम करोली बाबांची रेल्वेशी निगडीत ही चमत्काराची कथा बरीत प्रसिद्ध आहे. लेखक राम दास यांचे पुस्तक 'Miracle Of Love' मध्ये या चमत्काराचा उल्लेख आहे. एकदा बाबा तिकीटाशिवाय रेल्वेत चढले. तेव्हा तिकीट चेकरने रेल्वे थांबवून बाबांना खाली उतरवले. पण त्यानंतर बराच प्रयत्न करून रेल्वे सुरूच होईना, जागेवरून हलली सुद्धी नाही. चालकापासून ते इतर स्टाफपर्यंत सगळ्यांनी बराच प्रयत्न केला.

तोवर कोण्या अधिकाऱ्याला टिसी ने बाबांविषयीची घटना सांगितली. त्यानंतर लोक बाबांना शोधू लागले. मग त्यांना रेल्वेत पुन्हा बसण्याचा आग्रह झाला. काही वेळाने बाबा तयार झाले आणि हसत मुखाने रेल्वेत बसले. चालकाला रेल्वे चालवण्याचा आशीर्वाद दिला अन् रेल्वे सुरू झाली. त्यानंतर रेल्वेने नीम करोली गावात रेल्वे स्टेशन बनवलं.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री घायवळ गँगचा धुमाकूळ; गोळीबारात एक जण गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

माेठी बातमी! 'शिरवळमध्ये भरदिवसा गाेळीबार'; घटना सीसीटीव्‍हीत कैद, तिघांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ, नेमकं काय घडलं..

Chh. Sambhajinagar Accident : माळीवाडा पुलावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरखाली दुचाकीस्वाराचा जागीच मृत्य

सरकारचा मोठा निर्णय! आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ‘या’ लाखो लोकांचे जन्म-मृत्यू दाखले रद्द होणार आणि पोलिसांकडून दाखले जप्त होणार, नेमका आदेश काय?, वाचा...

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

SCROLL FOR NEXT