Supreme Court esakal
देश

NEET Exam : ‘नीट’ समुपदेशनास ब्रेक नाहीच; केंद्र, ‘एनटीए’ला परीक्षा रद्दवरून सर्वोच्च नोटीस

सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’ परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावरून आज केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) नोटीस बजावतानाच त्यांच्याकडून उत्तर मागविले.

पीटीआय

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’ परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावरून आज केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) नोटीस बजावतानाच त्यांच्याकडून उत्तर मागविले आहे. मात्र, न्यायालयाने समुपदेशनास स्थगिती दिलेली नाही.

या प्रकरणी दाखल काही याचिकांमध्ये या परीक्षेतील गैरप्रकाराची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली होती. या परीक्षेच्या अनुषंगाने विविध उच्च न्यायालयांमधील सुनावण्यांना न्यायालयाने ब्रेक लावला असून समुपदेशनाची प्रक्रिया थांबविली जाणार नाही असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

न्या. विक्रम नाथ आणि न्या. एस.व्ही.एन भट्टी यांच्या पीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. या प्रकरणामध्ये ‘एनटीए’कडून देखील चार वेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्यावर सुनावणी घेताना न्यायालयाने अन्य पक्षकारांचे म्हणणे मागविले आहे.

या प्रकरणामध्ये वीस याचिका दाखल करण्यात आल्या असून याचिकाकर्त्यांच्यावतीने वकील धीरज सिंह यांनी युक्तिवाद केला. ही परीक्षा रद्द करण्यासाठी निर्देश द्यावेत अशी मागणीही याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती. आता या सगळ्या याचिकांवर येत्या ८ जुलै रोजी एकत्रित सुनावणी घेण्यात येईल.

‘पंतप्रधानांना पेपरफुटी रोखण्यात अपयश’

‘नीट’ आणि ‘नेट’ परीक्षेतील कथित अनियमिततेच्या मुद्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केंद्र सरकारवर बोचरी टीका केली. पंतप्रधान मोदी हे निवडणुकीनंतर मानसिकदृष्ट्या कोलमडून पडले असून त्यांना सरकार चालविण्यासाठी अशाच प्रकारचा संघर्ष करावा लागेल असे त्यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केले. सध्या शैक्षणिक संस्थांवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कब्जा असल्याने पेपर फुटत आहेत.

या संस्था जोवर त्यांच्या हातातून सुटत नाही तोपर्यंत पेपर फुटतच राहतील असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदींनी रशिया- युक्रेन आणि इस्राईल-गाझा युद्ध थांबविल्याचे बोलले जात होते पण त्यांना पेपरफुटी मात्र रोखता येत नाही किंवा त्यांना ती रोखायची इच्छा तरी नाही असे दिसून येते असा आरोपही राहुल यांनी केला.

‘नीट’च्या पेपरफुटीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीतर्फे चौकशी करण्यात येईल. ही परीक्षा पूर्ण पारदर्शक पद्धतीने आयोजित केली जाईल व यात दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या भविष्याची कुणालाही खेळता येणार नाही.

- धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT