nehru name removed from nehru memorial museum and library sakal
देश

Nehru Memorial Museum : ‘नेहरू मेमोरिअल’चे नाव बदलले; केंद्र सरकारचा निर्णय, सरकार सुडबुद्धीने वागल्याचा काँग्रेसचा आरोप

केंद्र सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : येथील तीन मूर्ती भवनमधील ‘नेहरू मेमोरिअल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी’चे (एनएमएमएल) नाव बदलून आता ते ‘प्राईममिनिस्टर्स म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी’ असे करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे तीनमूर्ती भवन हे अधिकृत शासकीय निवासस्थान होते. नुकत्याच झालेल्या ‘एनएमएमएल’च्या विशेष बैठकीमध्ये नाम बदलाचा हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून आज सांगण्यात आले.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून ते या सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत. या बैठकीमध्ये बोलताना राजनाथसिंह यांनी या संस्थेच्या नाम बदलाच्या प्रस्तावाचे मनापासून स्वागत केले.

आता नव्या संस्थेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदींपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचे देशाच्या विकासातील योगदान ठळकपणे मांडले जाणार असून त्यांना नेमक्या कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले हे देखील त्यातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे याबाबतच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

संग्रहालयाची इंद्रधनुष्याशी तुलना

राजनाथसिंह यांनी यावेळी बोलताना पंतप्रधानांची एका संस्थेशी तुलना करताना विविध पंतप्रधानांचा प्रवास इंद्रधनुष्यातील रंगासारखा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इंद्रधनुष्याचे सौंदर्य खुलून दिसावे म्हणून सगळे रंग योग्य प्रमाणात असणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आता ताज्या ठरावानुसार संस्थेला नवे नाव मिळाले असून लोकशाहीमार्गाने सर्व पंतप्रधानांचा आदर केला जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी म्हणजे सूडबुद्धी ः रमेश

केंद्र सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी जोरदार टीका केली आहे. ही सूडवृत्ती आणि क्षुद्रपणा असून त्याचे नाव हे मोदी आहे. मागील ५९ वर्षांपासून ‘नेहरू मेमोरिअल म्युझियम अँड लायब्ररी’ (एनएमएमएल) वैश्विक विद्वत्तेचे प्रतीक आहे. या लायब्ररीमध्ये हजारो पुस्तके आणि संदर्भग्रंथ आहेत.

आता ही संस्था ‘प्राईममिनिस्टर्स म्युझियम अँड सोसायटी’ या नावाने ओळखली जाईल. ज्यांनी या देशाची उभारणी केली त्यांचे नाव आणि वारसा नष्ट करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी काय केले नाही? हा अत्यंत छोटा माणूस त्यांच्याच असुरक्षिततेखाली दबून गेला आहे, असे रमेश यांनी म्हटले आहे.

मोदीद्वेषामुळे काँग्रेसकडून विरोध ः त्रिवेदी

भाजपचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे सदस्य खा. सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, ‘‘ या संग्रहालयामध्ये पंडित नेहरूंपासून ते आतापर्यंतच्या सगळ्या पंतप्रधानांचे योगदान आणि त्यांनी नेमकं काय मिळवलं? हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. काँग्रेसच्या एकाही नेत्याने हा बदल पाहिलेला नाही.

माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, पी.व्ही. नरसिंहराव, राजीव गांधी आणि डॉ. मनमोहनसिंग यांचे काम ठळकपणे मांडण्यात आले आहे. आता देखील मी त्यांच्याच पंतप्रधानांची नावे घेतली आहेत. नरसिंहराव यांच्याबाबत त्यांच्या मनात कटुता आहे, हे मी समजू शकतो पण अन्य पंतप्रधानांच्या योगदानाला आक्षेप घेण्याचे कारण काय? मोदींना विरोध करताना त्यांनी स्वतःच्या नेत्यांचा देखील अवमान केला आहे.’’

‘नेहरू मेमोरिअल म्युझियम अँड लायब्ररी’चे नाव बदलण्याचा कुत्सित प्रयत्न केल्याने आधुनिक भारताचे शिल्पकार आणि लोकशाहीचे प्रहरी पंडित नेहरूंची उंची कमी होऊ शकत नाही. यातून केवळ रा.स्व.संघ आणि भाजपची क्षुद्र मानसिकताच दिसून येते. मोदी सरकारची खुजी मनोवृत्ती ‘हिंदच्या जवाहर’चे भारताच्या जडणघडणीतील योगदान कमी करू शकत नाही.

- मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष काँग्रेस

‘पीएम संग्रहालय’ हे या राजकारणाच्या पलिकडे जाण्याचा प्रयत्न असून काँग्रेसला मात्र ते दिसू शकत नाही. काँग्रेसचा दृष्टिकोन हा केवळ एका घराण्याचा वारसा जिवंत ठेवण्यापुरता मर्यादित आहे. अन्य पंतप्रधानांच्या योगदानाशी त्यांना काहीही देणेघेणे नाही.

- जे.पी. नड्डा, अध्यक्ष भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

Pune News: व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद, आंबेगाव तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांमध्ये असंतोष; आठ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट..

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT