देश

भारताशेजारच्या नेपाळमध्येही दिवाळी साजरी करण्याची अनोखी परंपरा

नेपाळमध्ये दिवाळी सणाला 'तिहार' असं म्हटल जातं.

सकाळ डिजिटल टीम

नेपाळमध्ये दिवाळी सणाला 'तिहार' असं म्हटल जातं.

मागील दोन दिवसांपासून देशात आनंदाने, उत्साहाने दिवाळी सण साजरा केला जात आहे. परंपरेप्रमाणे पहिल्या दिवशी वसुबारस आणि दुसऱ्या दिवशी धनत्रोयदशी साजरी केली जाते. हा सण देशभरात आनंदाचा प्रकाश पसरवणार आहे, असे मानले जाते. भारताप्रमाणे आपल्या शेजारील देश नेपाळमधेही दिवाळी मोठ्या परंपरा आणि संस्कृतीचे जतन करत साजरी केली जाते. मात्र सण साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे. श्वानाची पूजा करुन येथे दिवाळी सण उत्साहात साजरा होतो.

नेपाळमध्ये दिवाळी सणाला 'तिहार' असं म्हटल जातं. भारताप्रमाणे नेपाळमध्येही लोक या दिवशी नवीन कपडे घालून फटाके फोडतात. खाण्यासाठी अनेक गोडधोड पदार्थही बनवले जातात. मात्र दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येथे 'कुकुर तिहार' म्हणून एक दिवस साजरा होतो. याच दिवशी नेपाळचे लोक श्वानाची पुजा करतात.

भारताप्रमाणे नेपाळमध्येही पाच दिवस हा सण साजरा होतो. या पाच दिवसांत वेगवेगळ्या प्राण्यांची विधिवत परंपरेनुसार पुजा केली जाते. यादरम्यान श्वान, कावळा, बैल यांची पुजा केली जाते. कुकुर तिहार दिवशी श्वानांच्या प्रामाणिकपणा आणि चतुराईचा सन्मान केला जातो. त्यांना फुलांचे हार घातले जातात. आजच्या दिवशी त्यांना स्पेशल अंडी आणि दुध खायला दिले जाते. ही पूजा करण्यामागे नेपाळमधील लोकांची अशी श्रद्धा आहे की, श्वान नेहमी सोबत असावेत. ते यमाचे दूत आहेत असल्याचे मानले जाते. त्यामुळे तुमचा मृत्यू झाला तरी ते तुमचे रक्षण करतात. त्यामुळे त्यांची पूजा केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT