Nepal Interim PM Sushila Karki
esakal
Sushila Karki Nepal’s Interim Prime Minister News : नेपाळमध्ये अंतरिम सरकारचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांचे भारतामधी वाराणसी अर्थात काशी या तीर्थ क्षेत्राशी घनिष्ठ संबंध आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत सुशीला कार्की यांनी स्वतःचे वर्णन 'भारताची मैत्रीण' असे केले होते. विशेष म्हणजे त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून(बीएचयू) पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे. विशेष म्हणजे बीएचयूमध्ये असतानाच सुशीला कार्की यांची भेट त्यांचे जीवनसाथी दुर्गा प्रसाद सुबेदी यांच्याशी झाली.
बीएचयूमधील राज्यशास्त्राचे माजी प्राध्यापक दीपक मलिक यांनी कार्की यांच्या विद्यापीठातील वास्तव्याच्या आठवणींना उजाळा दिला. याचबरोबर त्यांनी नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान कार्की यांचे वर्णन “एक अतिशय प्रामाणिक आणि सक्षम नेत्या” असे केले. तसेच “नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांची निवड ही नेपाळच्या इतिहासातील एक मोठी पायरी आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो, असंही मलिक यांनी म्हटलं आहे.
याशिवाय, प्राध्यापक मलिक यांनी पीटीआयला सांगितले की, सुशीला कार्की यांनी १९७५ मध्ये बीएचयूमधून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यावेळी वाराणसी हे नेपाळमधील राजेशाहीविरोधी चळवळीचे केंद्र होते. तसेच, त्यांनी सांगितले की कार्की देखील त्याच 'राजेशाहीविरोधी' चळवळीशी संबंधित होत्या.
लेखक बीपी कोइराला, जे नंतर नेपाळचे पंतप्रधान झाले ते त्याच वेळी वाराणसीमध्ये सक्रिय होते. मलिक म्हणाले, १९४० ते १९८० दरम्यान, बीपी कोइराला देखील वाराणसीमध्ये होते आणि नेपाळी काँग्रेससाठी काम करत होते, ज्याचा आधार बीएचयूमध्ये होता. अशाप्रकारे सुशीला कार्की राजेशाहीविरोधी चळवळीशी जुडल्या गेल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.