file photo
file photo 
देश

धुक्‍यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

सकाळन्यूजनेटवर्क

उत्तरेकडे जाणाऱ्या 15 रेल्वेगाड्या रद्द; 27 गाड्यांना विलंब

नवी दिल्ली: दिल्ली व परिसरात काल रात्री झालेला पाऊस व हिमालयीन राज्यांत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात दाट धुके पडल्याने रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले आहे. आज सकाळपर्यंत दिल्लीकडून उत्तरेकडे जाणाऱ्या किमान 15 रेल्वेगाड्या रद्द कराव्या लागल्या, तर 27 गाड्या किमान 10 ते 12 तास विलंबाने धावत आहेत.

दिल्लीसह उत्तर भारतात उद्या व गुरुवारीही धुक्‍याचे आवरण कायम राहणार असल्याने रेल्वेचे वेळापत्रक आणखी रुळावरून घसरण्याची चिन्हे आहेत. आगामी दोन तीन दिवस दिल्लीवरील धुक्‍याचा पडदा आणखी गडद होण्याची शक्‍यता वर्तविली आहे. सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळात धुक्‍यापासून रेल्वेला बसणारा फटका कमी करण्यासाठी प्रस्तावात केलेली त्रिनेत्र योजना बासनात पडली आहे. या यंत्रणेच्या चाचण्या झाल्या तरी ते पुरविणाऱ्या विदेशी कंपन्यांबरोबर दराचे कोष्टक न बसल्याने रेल्वे बोर्डाने हात आखडता घेतला आहे. दरम्यान धुक्‍यामुळे उत्तरेकडील रेल्वेसेवा तर विस्कळित झाली आहेच; पण मुंबईसह दक्षिण-पश्‍चिम भारतातून येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या तुघलकाबाद, ओखला स्थानकांवरच रखडल्याचे दिसत आहे.

मुंबईत येणाऱ्या राजधानी गाड्यांना विलंबाचे प्रमाण कमी आहे. मात्र, इतर रेल्वे ठप्प राहिल्या. दुपारी बाराच्या सुमारास दिल्लीत हलके ऊन पडल्यावर रेल्वेगाड्या दिल्लीत आणण्यास सुरवात झाली. मात्र, तोपर्यंत नवी दिल्ली, निजामुद्दीनसह सर्व स्थानकांवर ट्रॅफिक जामची अवस्था उद्भवली होती. दिल्लीसह राष्ट्रीय राजधानीत आज सकाळी तापमान 13.8 डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरले, तर कमाल तापमान 27 डिग्री होते. काल सोमवारी तापमान 8 अंश सेल्सिअस राहिले. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज सकाळी साडेआठला दिल्लीतील दृश्‍यमानता घटून 800 मीटरपर्यंत आली होती. दरम्यान, दिल्लीत काल रात्रीपासून पाऊस झाल्याने प्रदूषणाचे संकट काहीसे सुसह्य झाले. हवेतील दूषित धुक्‍याची पातळीही किंचित कमी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT